Saturday, February 4, 2023

… म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजीचा अहवाल नातवाने ठेवला लपवून कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

- Advertisement -

सातारा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात आणि देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. देशात रोज ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. आताच्या परिस्थितीमध्ये घरातील सदस्याला अगदी सर्दी जरी झाली तरी कुटुंबीय त्या आजारी सदस्यांची काळजी घेत आहेत. तसेच काहीजण आपल्या जीवाभावाच्या लोकांना वाचवण्यासाठी रुग्णालयाचे उंबरठे झिजवत आहेत. अशामध्ये एका नातवाने आपल्या आजीसोबत धक्कादायक कृत्य केले आहे. त्याने आपल्या आजीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल लपवून ठेवला आहे. त्यामुळे त्याच्या आजीला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

हि घटना सातारा या ठिकाणची आहे. यामध्ये नातवाने आपल्या आजीचा कोरोनाचा अहवाल लपवून ठेवला होता. ४-५ दिवस त्याने हा अहवाल लपवून ठेवला होता. पण अखेर शेवटी सत्य कितीही लपवले तरी समोर येतेच. याबाबत नातवाला विचारले असता त्याने म्हातारवयात वृद्ध आजीचे संगोपन करावे लागू नये, म्हणून नातवाने हे अजब कृत्य केल्याचे त्याने कबुल केले आहे. हि धक्कादायक माहिती समोर येताच कुटुंबीय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. नातवाने कोरोना अहवाल लपवून ठेवल्याची माहिती समोर आली तेव्हा आजीला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

काय आहे नेमका प्रकार
मृत आजी काही दिवसांपूर्वी सातारा याठिकाणी आपल्या मुलीकडे राहायला आली होती. या दरम्यान तिच्या मुलीला आणि जावयाला कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये मुलगी कोरोनातून बरी झाली तर जावयाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जावयाचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी आजीलादेखील कोरोनाची बाधा झाली. पण म्हातारवयात वृद्ध आजीचे संगोपन करावे लागू नये,म्हणून नातवाने तिचा कोरोना अहवाल लपवून ठेवला. यामुळे वेळेत उपचार न मिळाळ्याने त्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.