Saturday, January 28, 2023

फलटणला जमीनीच्या वाटपावरुन नातवाने केला आजींचा खून

- Advertisement -

फलटण | फलटण शहरातील विमानतळ येथे एका वृद्ध महिलेचा तिच्याच नातवाने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. वडीलोप्रर्जित शेतजमीनीच्या वाटपाच्या कारणावरुन चिडुन जावून नातू आकाश सुखदेव शिंदे (रा.ठाकुरकी मळा ता. फलटण, जि. सातारा, हल्ली रा. आवी, ता. पंढरपूर, जि. सोलापुर) याने आजींचा खून केला.  मंगल बबन शिंदे (वय ६५ रा.ठाकुरकी मळा, ता. फलटण, जि. सातारा) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगल शिंदे या नेहमी प्रमाणे शेळ्या चारण्यासाठी फलटण शहरातील विमानतळ येथे गेलेल्या होत्या. तेथे नातू आकाश सुखदेव शिंदे याने लाकडी काठीने आज्जीला मारहाण केली. त्यावेळी वृद्ध आज्जी ही जमिनीवर पडली असता, आकाश याने एक मोठा दगड उचलून तिच्या डोक्यात घातला.

- Advertisement -

वृध्द आज्जीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात आनंदा बबन शिंदे (वय : 41, रा.विमानतळ नजीक, ठाकुर की मळा, फलटण, जि.सातारा) यांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे.अधिक तपास फलटण शहर पोलीस करीत आहेत.