तासगाव बाजार समितीवर स्वाभिमानीचा मोर्चा
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची तूट व सुटीच्या नावाखाली शोषन सुरू आहे. तर बेदाणा सौदयावेळी व्यापारी शेतकऱ्यांनी रक्ताच पाणी करून पिकवलेला माल उधळतात. यापुढे उधळलेल्या बेदाण्याची तूट अर्धा किलो पेक्षा जास्त धरली तर व्यापाऱ्यांना चोप देणार असल्याचा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱयांच्या विविध प्रश्नांवर तासगाव बाजार समितीवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
सांगली जिल्ह्यात दीड लाख एकरावर द्राक्ष शेती केली जाते. उत्पादित द्राक्षापैकी ५० ते ५५ टक्के द्राक्षे देशांतर्गत मार्केटमध्ये खाण्यासाठी पाठविली जातात. ही खरेदी विक्री संपूर्ण पणे व्यापाऱ्याच्या मार्फत होते. मात्र या व्यापाऱयांची कुठेही नोंदणी नाही. व्यापाऱ्यांचे नाव, गाव यांची काहीच माहिती ना शेतकरयांना असते, ना बाजार बाजार समितीकडे असते त्यामुळेच शेतकऱयांना कोट्यवधी रुपयांना फसवून जाणाऱ्या मंडळींचे प्रमाण वाढत आहे.
त्याला आळा घालण्यासाठी द्राक्ष हंगामात येणाऱ्या सर्व व्यापाऱ्याची नोंदणी तासगाव आणि सांगली बाजार समितीकडे नोंदणी करावी. त्याच्याकडून दहा लाखाचे डिपॉजित घ्यावे, त्यांना आयकार्ड द्यावे , बाजार समितीकडे नोंदणी करून आयकार्ड धारक व्यापाऱ्याला खरेदी विक्रीचा अधिकार राहील. या प्रमुख मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा तासगाव बाजार समितीवर नेण्यात आला. यावेळी सभापती जयसिंग जमदाडे यांनी निवेदन घेत मागण्यांवर लवकरच तोडगा काढु असे सांगितले.