धक्कादायक! मोठ्या बहिणीवर लहान भावाने केला रेप, गर्भवती झाल्याने झाला घटनेचा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्रेटर नोएडामध्ये भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका लहान भावाने आपल्याच मोठ्या बहिणीवर रेप केला आहे. हि बहीण जेव्हा गर्भवती झाली तेव्हा भावाने केलेले कृत्य उघडकीस आले. हे दोघे भाऊ-बहीण अल्पवयीन आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला बाल सुधार गृहात पाठवले आहे.

सध्या पीडिती मुलीचे काउन्सेलिंग सुरू आहे. या लहान भावाने तीन महिन्यांपूर्वी मोठ्या बहिणीवर रेप केला होता. हि मुलगी जेव्हा गर्भवती राहिली तेव्हा भावाच्या या कृत्याबाबत घरातील लोकांना समजले. सोमवारी पीडित मुलगी अचानक रडू लागली. तेव्हा आईने तिला रडण्याचे कारण विचारले असता ही घटना उघडकीस आली. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी भावाला अटक केली आहे.

यामध्ये धक्कादायक बाब अशी कि आरोपी आणि पीडित बहीण दोघेही अल्पवयीन आहेत. पीडितेच वय १६ असून ती ८विच्या वर्गात शिकते. तर तिचा आरोपी भाऊसुद्धा अल्पवयीन आहे. तिच्या छोट्या भावाने तीन महिन्यांआधी आणि त्यानंतरही काही दिवसांआधी दोनदा तिच्यावर अत्याचार केला होता. ज्यामुळे ती गर्भवती झाली असे पीडितेने पोलिसांना सांगितले.

You might also like