Green Tea Benefits: आरोग्यासाठी वरदान आहे Green Tea; होतात 3 जबरदस्त फायदे

Green Tea Benefits
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Green Tea Benefits – आजकाल ग्रीन टी पिण्याचे महत्व वाढले आहे, विशेषत: वजन कमी करण्याच्या दृष्टीने. ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्त्वांचा लाभ घेण्यासाठी अनेक लोक त्याचा उपयोग करत आहेत. ग्रीन टी पिण्यामुळे शरीरातील फॅट बर्न होण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते, पण केवळ ग्रीन टी प्यायल्यानेच वजन कमी होईल असे नाही. तर चला या बातमीबद्दल अधिक माहित जाणून घेऊयात.

ग्रीन टीमधील पोषक तत्त्व (Green Tea Benefits)

ग्रीन टीमध्ये मॅग्निझियम, पोटॅशियम, कॉपर, आयर्न, सोडियम, झिंक, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम सारखी पोषक तत्त्वं असतात. यासोबतच, कॅटेचिन आणि पॉलीफेनॉल्स सारखी अँटीऑक्सिडंट्स देखील ग्रीन टीमध्ये आढळतात, ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.

शरीरातील चरबी कमी करण्यास मदत –

ग्रीन टीमध्ये (Green Tea Benefits) असलेला कॅटेचिन घटक शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतो. यामुळे शरीरातील फॅट बर्न होण्याची प्रक्रिया चांगली सुरू होते. ग्रीन टी पिण्यामुळे शुगर, फॅट आणि कार्ब्सचे प्रमाण कमी होत असल्याने वजन वाढण्याचा धोका कमी होतो. पण , ग्रीन टी पिऊन वजन कमी होईल असं नाही. यासाठी, संतुलित आहार आणि नियमित व्यायामही तेवढाच महत्वाचा आहे.

त्वचेसाठी फायदेशीर –

ग्रीन टीची चव काही लोकांना कडवट किंवा तुरट वाटू शकते. यासाठी, त्यात मध, आले, लिंबू, तुलस, लवंग, इलायची, दालचिनी, हळद किंवा पुदीना टाकून चव चांगली करता येते. यामुळे ग्रीन टी अधिक स्वादिष्ट होईल, आणि त्याचा सेवन करणे सोयीचे होईल. ग्रीन टी केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही, तर ते त्वचेसाठी, पचनासाठी आणि हृदयरोगांवरील उपाय म्हणून देखील उपयोगी आहे. त्यामुळे ग्रीन टी (Green Tea Benefits) आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करणे हे आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते.