लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंती निमित्त मान्यवरांकडून अभिवादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । महाराष्ट्राचे माजी मंत्री, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज कारखाना कार्यस्थळी सामाजिक, राजकीय अशा विविध स्थरातील मंडळींनी कारखाना कार्यस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी सांगली जिल्ह्याचे युवा नेतृत्व प्रतिक जयंत पाटील यांनी विधिवत पूजा करून आभिवादन केले. यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस- बाळासाहेब पाटील यांनीही पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या कार्याचा प्रभाव राज्यभर झाला होता. त्यांना वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात महसूल उपमंत्री म्हणून प्रथम संधी मिळाली. पुढे ते महसूल मंत्री झाले. उद्योग आणि ऊर्जा खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली. सलग बारा वर्षे ते राज्य मंत्रिमंडळात कार्यरत राहिले. त्या-त्या खात्यांची जबाबदारी सांभाळताना अनेक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतले. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित मुंबई प्रांताचा भाग मिळून महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. राजारामबापू पाटील यांनी पहिली शेतकरी परिषद खुजगावला १७ जून १९७३ रोजी घेतली होती. हजारो शेतकरी जमले होते. कोल्हापूर जिल्ह्यातूनही त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

आज लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंती निमित्त सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळी जाऊन लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी. काँग्रेस मधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह रोहित कांबळे, हिम्मतराव पाटील, अथर्व साळुंखे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment