सलाम त्यांच्या कार्याला ! घर वाहून गेल तरी त्या उघड्या मॅनहोल पासून अजिबात ह्टल्या नाहीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासून मुंबई मध्ये नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या संदर्भात अनेक फोटो आणि व्हिडीओ वायरल झाले आहेत. परंतु त्याबरोबर एक व्हिडीओ वायरल झाला आहे कि, त्यामध्ये एक महिला मुंबई मधील रस्त्यावर असलेल्या मॅनहोल जवळ उभी राहून अनेक रस्त्यावरील गाडयांना वाट करून देत आहे. कोणाचे अपघात होऊ नये म्हणून त्यांनी भर पावसात उभे राहून लोकांना मदत केली आहे.

काही दिवसांपूर्वी हा व्हिडीओ हा फेसबुक च्या माध्यमातून शेअर झाला आहे. या व्हिडीओ चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या महिलेची ओळख पटली असून हि महिला माटुंगा वेस्ट च्या तुलसी पाइप येथे उभी होती. पाण्याचा निचरा होण्यासाठी त्या महिलेने मॅनहोल चे झाकण काढले होते. त्यानंतर ती भर पावसात जवळपास पाच तास अपघात होऊ नये म्हणून उभी होती. या महिला जेव्हा घरी गेली त्यावेळी तिचेपण घर पावसात वाहून गेले होते. तसेच मुलींच्या शिक्षणासाठी जमवलेले १० हजार पण वाहून गेले होते.

मिरर ने दिलेल्या माहितीनुसार त्या महिलेचे नाव हे कांता मारुती कालानं आहे. त्या माटुंगा येथील रेल्वे स्थानक येथील झोपडपट्टीत राहतात. त्यांना आठ मुले आहेत सहा जणांची लग्न झाले असून अजून दोन मुली या अनुक्रमे ९ वी ते १० वी मध्ये शिकत आहेत. त्याच्या शिक्षणासाठी साठवलेले दहा हजार पण पाण्यासोबत वाहून गेले आहेत. त्या भर पावसात पाच तास उभ्या होत्या. त्याचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. परंतु त्यांच्या या समाज कार्याचे पण महानगरपालिकेला काहीही घेणे देणे नाही. संताप जनक बाब म्हणजे महानगर पालिकेच्या अधिकारी परवानगी शिवाय मॅनहोल कसे उघडले अशी विचारणा केली आहे.सलाम त्याच्या कार्याला ! घर वाहून गेल तरी त्या उघड्या मॅनहोल पासून अजिबात ह्टल्या नाहीत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment