व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

गुजरात ATS ची मोठी कारवाई : 1993 च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टप्रकरणी चौघांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एटीएसच्या पथकाकडून ठिकठिकाणी छापे टाकत 1993 साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपींना पकडले जात आहे. दरम्यान आज गुजरातच्या एटीएसच्या पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई बॉंबस्फोट प्रकरणातील चार आरोपींना पथकाने अटक केली आहे.

याबाबत अधिकार माहिती अशी कि, 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्ब स्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला दहशतवादी अबू बकला यूएईतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर गुजरात एटीएसच्यावतीने आज केलेल्या कारवाईत सय्यद कुरेशी, शोएब कुरेशी उर्फ शोएब बाबा, युसुफ भटका, अबू बकर या चौघांना अटक करण्यात आली आहे. 1993 साली मुंबईतीलवेगवेगळ्या ठिकाणी 12 साखळी बॉम्ब स्फोट घडवण्यात आले होते. तब्बल 257 लोक या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते, तर 700 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.

तब्बल 29 वर्षानंतर अबू बकर नावाचा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी भारतीय यंत्रणांच्या हाती लागला असल्याची चर्चा होती. यानंतर आता एएनआयने ट्विट केले असून त्यामध्ये मुंबई बॉंबस्फोट प्रकरणातील चार जणांना अटक करण्यात आली असल्याचे म्हंटले आहे. मुंबई बॉम्ब स्फोट हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड आरोपीला 4 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.

अटक करण्यात आलेले चौघे कोण?

गुजरात एटीएसने आज कारवाईत ज्या चार आरोपीना अटक केलेली आहे. ते 1993 साली 12 मार्च रोजी मुंबई साखली बॉम्बस्फोट झाले होते. संपूर्ण मुंबईसह देशही या दहशतवादी हल्ल्याने हादरला होता. त्यातील संशयित म्हणून या चौघांना अटक करण्यात आली आहे.