शिवतीर्थावर गांधी- पवारांचे विचार मांडू नका; गुलाबरावांचा उद्धव ठाकरेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवतीर्थावर अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यांची सभा झालीच पाहिजे पण या सभेत उद्धव ठाकरे शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे विचार मांडू नये असा टोला शिंदे गटातील आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. ते जळगावात बोलत होते.

कोर्टाने जर उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली असेल तर कोर्टाचा निकाल सर्वानी मान्य केला पाहिजे. आम्हीही मान्य केला आहे. आम्ही आमच्या बीकेसी येथील सभेच्या तयारीला लागलीच आहोत. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंनी नक्कीच सभा घ्यावी पण सोनिया गांशी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

दरम्यान, काल पुण्यात पीएफआय कार्यकर्त्यांकडून पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या, त्याबाबत गुलाबरावांना विचारलं असता अशा लोकांना जेलमध्ये टाकलच पाहिजे. देशाचं अन्न खायचं. हवा घ्यायची आणि पाकिस्तानचे नारे द्यायचे मग त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवून दिले पाहिजे मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला.