सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री!! एसटी कष्टकरी जनसंघाची केली स्थापना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अखेर राजकारणात एन्ट्री केली आहे. सदावर्ते यांनी एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेची स्थापना केली आहे. पत्रकार परिषद घेऊन सदावर्ते यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे सदावर्ते आता राजकारणाच्या आखाड्यात दिसणार आहेत.

नव्या संघटनेची स्थापना करून गुणरत्न सदावर्ते आगामी एसटी बँक निवडणूक लढवणार आहेत. एसटी कष्टकरी जनसंघ’ या संगघटनेच्या माध्यमातून एसटी बँकेची निवडणूक लढवणार असून आम्ही प्रस्तापीतांना धक्का देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या एसटी बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेची सत्ता आहे.

एसटी महामंडळाची बँक ही सहकाराची बँक असून ती एक स्टेट आहे. ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून देण्याची प्रक्रिया आहे, ती कोणाच्या बापाच्या घरची व्यवस्था नाही. कोणाला इथं भ्रष्टाचारासाठी मोकळीक दिलेली नाही. त्यामुळं कष्टकरी एसटी कर्मचारी आपली स्वतःची माणसं निवडतील अस सदावर्ते म्हणाले.

एसटी बँकेत सध्या तब्बल 90 हजार मतदार आहेत. सदावर्ते यांनी यापूर्वी एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर निशाणा साधला होता. शरद पवार यांच्या मुळेच एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण झालं नाही असा आरोप त्यांनी केला होता. आता तर त्यांनी एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेची स्थापना राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment