BREAKING : गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाकडून 4 दिवसाची पोलिस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा व कोल्हापूरच्या छत्रपतीच्या गादीचा अवमान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना काल गुरूवारी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सातारा कोर्टात हजर करण्यात आले होते. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सातारा पोलिस ठाण्यात गुरूवारची रात्र गुणरत्न सदावर्ते यांना काढावी लागली. त्यानंतर मोठ्या पोलिस बंदोबस्तात सातारा कोर्टात हजर करण्यात आले होते. आरोपी हा सरकारी वकील असल्याने 14 दिवसांची पोलीस कोठडी सरकारी वकील अंजुम पठाण यांनी मागितली. त्यावर गुणरत्न सदावर्ते हे एक प्रतिष्ठित वकील आहेत. तसेच सर्व पुरावे गोळा केले आहेत, मग कशाला 14 दिवसाची कोठडी पाहीजे असा युक्तिवाद सदावर्ते यांचे वकील सचिन थोरात यांनी केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन वर्ष पोलिस काय करत होते, असा सवालही वकीलांनी उपस्थित केला.

सदावर्ते याचे वकील सचिन थोरात म्हणाले, केवळ टीव्हीवर ऐकून तक्रारदाराने सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदावर्ते यांना देण्यात आलेल्या नोटीशीवर तारीख नाही. त्यामुळे केलेली अटक कायदेशीर नाही. त्याप्रमाणे गुन्ह्यात कोणतीही रिकव्हरी करायची नाही, त्यामुळे सदावर्ते यांना जामीन देण्याची मागणी वकिलांनी केली. सदावर्ते याचे वकिल महेश वासवानी हे मुंबईला गेल्यामुळे सचिन थोरात, सतीश सुर्यवंशी आणि प्रदीप डोरे यांनी युक्तिवाद केला.

Leave a Comment