काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला, Live Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबूल : वृत्तसंस्था – काबूलमधील गुरुद्वारा कर्ते परवानवर (Gurudwara Karte Parwan) हल्ला झाला आहे. गुरुद्वाराच्या आतमध्ये सशस्त्र दहशतवादी असल्याचे समजत आहे. गुरुद्वाराच्या (Gurudwara Karte Parwan) आतून गोळ्यांचा आवाज येत असून इमारतीतून धूर निघत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हे व्हिडिओ घटनास्थळापासून काही अंतरावरुन शूट करण्यात आले आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, सुरुवातीला गुरुद्वारामधून (Gurudwara Karte Parwan) गोळीबाराचा आवाज येत आहे. काहीच वेळात इथे धुराचे लोट पाहायला मिळतात. शीख बांधव आसपासच्या परिसरात उभा असलेले दिसतात. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी शनिवारी सकाळी अफगाणिस्तानच्या राजधानीतील गुरुद्वारा कार्ते परवानमध्ये (Gurudwara Karte Parwan) प्रवेश केल्याचे समजत आहे.

राष्ट्रीय राजधानीत राहणार्‍या अफगाणिस्तान वंशाच्या शीखांनी सांगितलं की, त्यांना गुरुद्वारा कर्ते परवानचे (Gurudwara Karte Parwan) अध्यक्ष गुरनाम सिंग यांचे फोन आले आहेत आणि त्यांना हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. या अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. यात किती जणांचा मृत्यू झाला हे मात्र अजून समजू शकलेले नाही.

हे पण वाचा :
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या सरपंचावर गोळीबार, थोडक्यात बचावले

IND vs SA: हार्दिक पांड्याने दिला ‘हा’ सल्ला आणि Dinesh Kartikनं 16 वर्षांनी रचला इतिहास

हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेची आत्महत्या : सासूसह चाैघांवर गुन्हा दाखल

मोदींच्या आईचे 100 व्या वर्षात पदार्पण; पाय धुवून मोदींनी घेतले आशीर्वाद

बीड जिल्हा रुग्णालयात जोरदार राडा, आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच्या पती आणि सासूला मारहाण

Leave a Comment