गुटखा सापडला : साताऱ्यात दहशतवादी विरोधी पथकाने 13 लाखाचा मुद्देमाल जप्त केला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

दहशतवाद विरोधी पथकाने सातारा शहर परिसरात सापळा लावून बुधवार नाका परिसरात लाकडी पुलाजवळ एक इसम टेम्पो घेऊन आला होता. त्याच्याकडे चौकशी करून टेम्पोची तपासणी केली. त्या संशयित इसमाकडून 12 लाख 82 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. एकास अटकही केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील बुधवार नाका परिसरात शनिवारी दि. 4 डिसेंबर रोजी दहशतवाद विरोधी पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत सातारा शहर परिसरात राज्यात विक्री व बाळगण्यास बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी टेम्पोमधून येणार असल्याची माहिती मिळाली होती. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून आरोपीला अटक करून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधनाका परिसरात आलेल्या टेम्पोमध्ये हिरा कंपनीचा पान मसाला व रॉयल 717 टोबॅको आढळून आले. यावेळी 3 लाख 32 हजार 640 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व 5 लाख 50 हजार रोख रक्कम आणि वाहन असा 12 लाख 82 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच संशयिताला अटक करण्यात आले आहे.

Leave a Comment