शंभरहून अधिक महिलांना आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवणाऱ्या 22 वर्षीय जिम ट्रेनरला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर शंभरहून अधिक महिलांचा छळ केल्याप्रकरणी जिम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे. फेसबुकसह अन्य समाज माध्यमांतून नजर ठेवून त्रास दिल्याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. जिम ट्रेनर विकास कुमार याच्यावर आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडीओ पाठवून महिलांचा छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दिल्लीतील महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शनिवारी विकासला सायबर स्टॉकिंग प्रकरणी अटक केली आहे. वारंवार बजावूनदेखील ऑनलाईन स्टॉकिंग आणि आक्षेपार्ह मेसेज करुन विकास त्रास देत असल्याची तक्रार पीडितेने केली आहे. आरोपीने तुझे वैयक्तिक तपशील माहित असल्याचं सांगून महिलेला धमकीसुद्धा दिली. दिल्लीच्या सायबर टीमने फेसबुकशी संपर्क साधून आरोपीचा तपशील मिळवला. यानंतर आरोपीने महिलांना लक्ष्य करण्यासाठी फेक आयडी उघडले होते. त्यावर दिलेले सर्व डिटेल्स चुकीचे होते, अशी माहिती दक्षिण पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी दिली आहे.

आरोपीला राहत्या घरातून अटक
“संबंधित फेसबुक अकाऊण्टशी लिंक करण्यात आलेल्या फोन नंबरशी संपर्क करून तो नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा तो अन्य व्यक्तीचा असल्याचे समजले. आरोपी हा तक्रारदार महिलेच्या घराजवळच राहत असल्याचे आम्हाला समजले” असे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी सांगितले. यानंतर आरोपी विकास कुमारला राहत्या घरातून अटक केले.

महिलांच्या नावानेच फेक फेसबुक अकाऊण्ट
आरोपी विकासने महिलांशी संपर्क साधण्यासाठी महिलांच्या नावानेच फेक फेसबुक अकाऊण्ट बनवले होते. त्याच्या फ्रेण्ड लिस्टमध्ये दोन हजारांहून अधिक महिला होत्या. यापैकी शंभरहून अधिक महिलांवर तो पाळत ठेवत होता. तसेच महिलांना व्हिडीओ कॉल करुन त्या माध्यमातून तो हस्तमैथुन करत असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे.

Leave a Comment