औरंगाबाद शहरातील प्रत्येक वॉर्डात हनुमान चालीसा पठण करणार; मनसेचा निर्धार 

औरंगाबाद – राज्यात सध्या भोंगे आणि हनुमान चालीसाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान आज हनुमान जयंती आहे. औरंगाबाद शहरातील प्रत्येक वॉर्डात हनुमान चालीसा पठण करणार, तसेच जर हिंदुस्थानात हनुमान चालीसा म्हणायचं नाही तर कुठे म्हणायचं असा सवाल मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांची उपस्थित केला आहे.

सध्या राज्यात भोंगे आणि हनुमान चालीसा यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. आज हनुमान जयंतीचे औचित्य साधून पहिल्यांदा औरंगाबाद शहरात मनसेच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसा पाठणाचे कार्यक्रम शिवसेनेचा बालेकिल्ला समजले जाणाऱ्या गुलमंडी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरा समोर समिहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले.

यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी कार्यरत यांची उपस्थिती होती. या वेळी जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या वेळी पोलिसांनी कार्यक्रमाच्या एकदिवस अगोदर दिलेल्या नोटिसावरून मनसेच्या वतीने राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.‌ या देशात कायदा सर्वांना समान आहे. तसेच ये तो सिर्फ झाकी है ॲक्शन अभी बाकी है असा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला.