Happy Birthday अल्लू अर्जुन | मुलींच्या मोबाईलचा वॉलपेपर व्यापणारा ‘डॅशिंग क्युट बॉय’ झाला ३७ वर्षांचा

बॉलिवूड कट्टा | तेलगू चित्रपटसृष्टीतला डॅशिंग हिरो अल्लू अर्जुन याचा आज वाढदिवस..!! अल्लू अर्जुन हा संपूर्ण भारतातील कित्येक तरुणींच्या मनाचा soft corner आणि कित्येक तरुणांचा स्टाईल आयकॉन आहे. अल्लू अर्जुन हा एकमेव असा दाक्षिणात्य अभिनेता आहे की ज्याच्या हिंदी dubbed चित्रपटांचा एक खूप मोठा चाहता वर्ग आहे..!! त्याच्या डान्स स्टाईलवर त्याचे असंख्य चाहते फिदा आहेत. अल्लू अर्जुनच्या “Aarya” या चित्रपटामुळे तो प्रचंड नावाजला गेला. भारतीय चित्रपटसृष्टीत अतिशय गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे आर्या. या चित्रपटानंतर तो फक्त Tollywood चाच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचा हिरो बनला असं म्हणायला हरकत नाही. पण खरंतर हा सुपरस्टार Aarya चित्रपटाच्या आधीही बरेच वर्षे अनेक चित्रपट आणि शॉर्टफिल्म्समध्ये भूमीका करत होता. Starkid असला तरी त्यानं फार कमी काळात स्वतःची अशी ओळख निर्माण केली. आज जाणून घेऊयात याच अभिनेत्याचा प्रवास…

अल्लू अर्जुनचा जन्म चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या अभिनेते, प्रोड्युसर आणि डायरेक्टर असणाऱ्या कुटुंबात झाला. सुप्रसिद्ध प्रोड्युसर अल्लू अरविंद हे त्याचे वडील आणि तेलगू चित्रपट क्षेत्रातले सुप्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी हे अल्लू अर्जुनचे मामा. त्यामुळं घरातूनच त्याला अभिनयाचं बाळकडू मिळत गेलं. अल्लू अर्जुन बद्दल अजून एक विशेष गोष्ट म्हणजे त्यानं बाल कलाकार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. 1985 मध्ये वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी Vijetha नावाच्या चित्रपटामध्ये त्यानं बाल कलाकार म्हणून भूमिका पार पाडली होती. म्हणजेच त्याच्या अभिनयाची सुरुवात तो दोन वर्षांचा असल्यापासूनच झाली होती. त्याच्या कित्येक चाहत्यांना त्याच्याबद्दलची ही गोष्ट माहीत नसेल. बाल कलाकार म्हणून अभिनय केल्यानंतर अल्लू अर्जुन पुन्हा पडद्यावर झळकला ते थेट 16 वर्षांनी. 2001 मध्ये “Daddy” या चित्रपटात डान्सरची एक छोटी भूमिका अल्लू अर्जुनने केली. त्यानंतर 2003 मध्ये “Gangotri” या चित्रपटात त्यानं त्याच्या करिअरमधली पहिली मुख्य अभिनेता म्हणून भूमिका साकारली आणि मोठ्या पडद्यावर धमाकेदार entry केली. त्यानंतर तो प्रेक्षकांच्या भेटीला आला Arya या चित्रपटातून. आणि हाच चित्रपट त्याची स्वतःची ओळख भारतीय चित्रपटसृष्टीत निर्माण करण्यासाठी महत्वाचा ठरला. त्याच्या करिअरला खूप महत्वाचं वळण या चित्रपटामुळे मिळालं. संपूर्ण भारतभरात या चित्रपटामुळे अल्लू अर्जुन हे नाव चर्चेत आलं. लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड्स या चित्रपटाने मोडले. याच फिल्मसाठी अल्लू अर्जुनला Filmfare Best Telugu Actor Award साठी नामांकन मिळालं. त्याचसोबत त्यानं Nandi Awards या अतिशय सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या समारंभात याच चित्रपटासाठी Special Jury Award ही मिळवलं. इतक्यावरच न थांबता त्यानं याच चित्रपटासाठी CineMAA Awards चे Best Actor आणि Best Actor Jury अशी दोन पारितोषिकं पटकावली. व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रचंड यशस्वी ठरलेला असा हा चित्रपट..!!

त्या फिल्मपासून सुरू झालेला त्याचा धडाकेबाज प्रवास आजतागायत सुरूच आहे. Arya नंतर Bunny, Happy, Desamuduru अशा लगातार ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून तो प्रेक्षकांची मनं जिंकत राहिला. Shankardada Zindabad, Paragu या फिल्म्सनंतर 2009 मध्ये त्यानं Arya 2 याही चित्रपटामध्ये भूमिका पार पाडली. Arya ला ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला त्याच पध्दतीने त्याच्या पुढच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत गेली. 2009 मध्ये Paragu या तेलगू चित्रपटातील भूमिकेसाठी अल्लूला त्याच्या आयुष्यातील पहिल्या Filmfare Award For Best Actor या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. पुढे मात्र 2011 मध्ये Vedam आणि 2015 मध्ये Race Gurram या चित्रपटांसाठी सुद्धा त्याला Best Acting साठी Filmfare Awards मिळाले. Badrinath, Julayi या चित्रपटांमधून आव्हानात्मक भूमिका पार पाडत तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत राहिला. 2014 मध्ये Yavadu या चित्रपटाने पुन्हा लोकप्रियतेचे नवे रेकॉर्ड्स निर्माण केले. आजही त्याच्या कित्येक चाहत्यांना या चित्रपटामधली त्याची भूमिका आठवते आणि आवडतेसुद्धा.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले बरेचसे अभिनेते विशेष प्रसिद्ध असतात ते त्यांच्या स्टाईलसाठी. विजय देवेराकोंडा असो किंवा महेशबाबू, नागार्जुन, ज्युनिअर NTR सारखे कुणीही असोत यापैकी प्रत्येकाची ड्रेसिंग स्टाईल ही नेहमीच चर्चेचा विषय ठरत आलीय. याच सगळ्या यादीमधलं अजून एक महत्वाचं नाव म्हणजे अल्लू अर्जुन. Tollywood चा सुपरहिरो. विमानतळावर असो किंवा एखाद्या अवॉर्ड फंक्शनमध्ये , अल्लू अर्जुनची ड्रेसिंग स्टाईल नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. “स्टाईल आयकॉन” अशी स्वतःची ओळख त्यानं आपल्या स्टाईलमधून निर्माण केलेली जाणवते. स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनच्या वयात जरी आजच्या दिवशी भर पडली असली तरी त्याच्या लोकप्रियतेत मात्र आजच्या घडीला जराशीही घट झालेली दिसून येणार नाही. अफलातून स्टाईल आणि दिलखुलास डान्स या दोन्ही कौशल्यामुळे फक्त दाक्षिणात्य प्रेक्षकच न्हवे तर संपूर्ण भारतीय प्रेक्षक त्याच्यावर प्रचंड प्रेम करतात.

तब्बल तीन Filmfare Awards, दोन Nandi Special Jury Awards आणि CineMAA Award ने सन्मानित झालेला आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं विशेष स्थान निर्माण करणारा, लोकप्रियतेची शिखरं गाठणारा असा हा सुपरहिरो..!!

आजच अल्लू अर्जुनच्या जन्मदिनी त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या पोस्टरचा First Look रिलीज झालाय. “पुष्पा” नावाच्या चित्रपटामधून अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदाना हे दोन सुपरहिट कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट हिंदीसह एकूण पाच भाषांमध्ये रिलीज होणार असल्याचं सुद्धा आज सांगण्यात आलंय. त्यामुळं अल्लू अर्जुनच्या सर्व भाषांमधल्या चाहत्यांना त्याचा हा चित्रपट पाहता येणार आहे. अल्लू अर्जुन म्हणजे अभिनय, डान्स, स्टाईल, कामाप्रति प्रामाणिकता, आदर आणि मेहनत यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या अनेक चित्रपटांमधून तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत राहिला, आजही करतोय आणि पुढेही करत राहील हा विश्वास आहेच..!!

लेखन – विभावरी विजया नकाते. लेखिका मानसशास्त्र विषयातील पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत. त्यांना वाचन, लिखाण आणि संवादाची विशेष आवड आहे. त्यांचा संपर्क क्रमांक – 8408877063

You might also like