Happy Birthday Google |गुगल झाले २० वर्षांचे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Techबाबा | वीस वर्षांपूर्वी स्टेंडफोर्ड विद्यापिठाच्या पी.एच.डी. च्या दोन विद्यार्थ्यांनी एक नवीन सर्च इंजिन लाँच केले. जगभरातील सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध करुन तिला अधिक उपयोगी बनवणे हे त्यामागिल उद्दिष्ट होते. १९९८ साली स्थापन झालेल्या या सर्च इंजिनमधे मधल्या काही वर्षांमधे अफाट बदल झाले आणि आज गुगल २० वर्षांचे झाले आहे. एकुण १५० भाषांमधे आणि १९० हून अधिक देशांमधे गुगल वापरले जाते. गुगलच्या वाढदिवसानिमित्त Happy Birthday Google हा हॅशटॅग सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे.

भारतात Google.co.in ही सेवा मराठी, हिंदीसह नऊ भारतीय भाषांत उपलब्ध आहे. गुगलने मागील २० वर्षांत यशाची उत्तुंग झेप घेतली आहे. माहितीचे सारे युग गुगलने आपल्यात सामावून घेतला असून जगापुढे माहितीचे भांडार खुले करून दिले आहे.

गुगल ने २० व्या वाढदिवसानिमित्त एक खास डुडल लाँच केले आहे. मागील २० वर्षांत जगभारत सर्वात जास्त सर्च झालेले सर्चेस गुगलने त्यात दाखवले आहेत.

Leave a Comment