रोहित पवार यांच्या लग्नाचा वाढदिवस, ट्विटरवरून बायकोला दिल्या शुभेच्छा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे भावी अध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे आमदार रोहित पवार यांच्या लग्नाचा आज नववा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंट वरून पत्नी कुंती बद्दल प्रेम व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. सामान्य माणसाच्या नेहमी संपर्कात असणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या आणि पत्नी कुंती यांच्या नात्याबद्दल ते काही वेळा बोलत असतात.

ट्विटर अकॉउंट वरून पत्नीला शुभेच्छा देत सहजीवनाला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत असे त्यांनी पोस्टद्वारे सांगितले आहे. त्यांनी शुभेच्छा देताना पत्नीचे कौतुक केले आहे आणि त्यांच्या यशाची वाटेकरू असल्याचेही म्हंटले आहे. त्यांनी ट्विटर वर “गृहलक्ष्मी, सून, वहिनी, पत्नी, आई अशा अनेक भूमिका लिलया पार पाडणारी, गरुडभरारी घेण्याची ताकद आणि जबाबदारीची जाणीव असलेली व माझ्या यशात सिंहाचा वाटा असणारी माझी साथीदार सौ. कुंती हिला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा” अशी पोस्ट केली आहे.

 

रोहित पवार व त्यांच्या पत्नी सौ कुंती मगर पवार यांच्यातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. पुण्यातील बिल्डर सतीश मगर हे कुंती पवार यांचे वडील आहेत. कुंती यांनी नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीतून अर्थशास्र आणि गुंतवणूक या विषयात पदवी संपादन केली आहे. रोहित-कुंती या जोडप्याला दोन मुली आहेत. या दोघांच्या लग्नात अजित पवार यांनी खूप महत्वाची भूमिका निभावली आहे. असेही रोहित पवार यांनी एकदा सांगितले होते. दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.