थँक यू भावा..! भज्जीच्या मदतीला धावला सोनू सूद; ट्विटरवर केली होती रेमडेसीवीरची मागणी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या कोरोनाच्या या लाटेत अनेक लोक अक्षरशः हतबल होऊन इतरांकडे मदतीच्या आशेने पाहत आहेत. या कठीण काळात अनेकांनी स्वतःहून मदतीचा आपापल्या परीने हात पुढे केला. मात्र बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना काळात गरजूंसाठी देवदूत बनला आहे. तो नेहमीच सर्वाना शक्य तितकी पूर्ण मदत करताना दिसतो. सध्या या संकटाच्या काळात तो फक्त गरजूंनाच नाही तर कलाकार आणि खेळाडूंना देखील मदत करत आहे. कोलकाता संघातील स्टार खेळाडू हरभजन सिंगने देखील ट्वीट करत रेमडेसीवीरची मागणी केली होती. हा मेसेज सोनूपर्यंत पोहोचला आणि मग काय सोनूने तात्काळ इंजेक्शन उपलब्ध करून दिले.

हरभजन सिंगने १२ मे २०२१ रोजी ट्वीट करत कर्नाटक चित्रदुर्ग येथे एक रेमडेसीवीर इंजेक्शन तातडीने हवे असल्याचे आवाहन केले होते. त्याखाली पत्ता आणि फोननंबरही दिला होता. त्यानंतर सोनूपर्यंत हा मेसेज पोहोचला आणि त्याने काम होईल असा रिप्लाय देखील दिला आहे.

सोनूने मदत केल्यानंतर हरभजन सिंगने सोनूचे ट्वीटरवर थँक यु ब्रदर म्हणत खूप आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी सुरेश रैनाने ट्वीटरवर मदत मागितली होती. तो मेसेज वाचून त्यालाही सोनू सूदने मदत केली होती. सुरेश रैनाच्या कुटुंबातील एका व्यक्तीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता होती. त्यावेळी सोनूने योग्य वेळेत मदत केली होती. म्हणून सुरैश रैनाने देखील सोनूचे आभार मानले होते.

अभिनेता सोनू सूदने गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत व आपापल्या प्रियजनांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली होती. इतकेच नव्हे तर अगदी धान्यापासून ते आवश्यक वस्तूंपर्यंत या गरजूना त्यांने मदत केली. हा मदतीचा ओघ गतवर्षपासून आजच्या या कठीण काळातही तितकाच जोशाने कायम आहे. आता देखील सोनू सूद देवासारखाच लोकांच्या मदतीला धावून येत आहे. लोक अक्षरशः त्याला देवासमान मनात आहेत. तर अनेक लोक त्याने पंतप्रधान व्हावे अशी मागणी करीत आहेत.

You might also like