मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण निषेधार्थ केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर-बादल यांचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली प्रतिनिधी । शेतकरी विरोधी अध्यादेश व कायद्याच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेली सहा वर्षे ‘एनडीए’चा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दल शेतकरी विधेयकाच्या समर्थानात अचानकपणे मोदी सरकार मधून बाजूला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

हरसिमरत कौर-बादल यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा ट्विटरवरुन केली आहे. ट्विटर संदेशात त्या म्हणाल्या की, ”शेतकरीविरोधी अध्यादेश व कायद्याच्या निषेधार्थ मी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. शेतकऱ्यांची मुलगी व बहीण म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा मला अभिमान आहे.”

आज ‘कृषी व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020’ याबाबत लोकसभेत बोलतांना शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी स्पष्ट केले की, शिरोमणी अकाली दल शेतकऱ्यांचा पक्ष असल्याने या विधेयकातील कृषी संबंधित काही त्रुटींकडे बघता आम्ही ह्या विधेयकाचा विरोध करतो आहोत.आमचा पक्ष शेतकरी विरोधी राजकारणाला कधीच पाठिंबा देणार नाही हेही बादल यांनी स्पष्ट केलं.


Leave a Comment