पवारांविषयी बोलताना हसन मुश्रीफ स्टेजवरच गहिवरले; सांगितला मिरज दंगलीनंतरचा ‘तो’ किस्सा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार यांचा आज 81वा वाढदिवस आहे. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या. पण पवारांवर बोलताना मुश्रीफ गहिवरले. भावूक झालेल्या मुश्रीफांना यावेळी अश्रू अनावर झाले हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांना व्हर्च्युअल पद्धतीने आज शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबतच्या अनेक आठवणी जागवल्या. मिरज दंगलीनंतर मुश्रीफ निवडून आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करताच मुश्रीफ गहिवरून गेले. त्यांना अश्रू रोखणे अवघड झाले.

पवारांना व्हर्च्युअल पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी ते कोल्हापुरातून सहभागी झाले होते. शरद पवार यांच्या विषयी बोलताना मंत्री मुश्रीफ यांना स्टेजवरच अश्रू अनावर झाले. शरद पवार यांनी राजकारणात दिलेली संधी, केलेलं मार्गदर्शन या विषयाचे अनेक किस्से यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी एक किस्साही आवर्जून सांगितला, तो होता 2009 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतरचा.

2009 च्या विधानसभा निवडणुकीआधी सांगली जिल्ह्यातील मिरज येथे गणेशोत्सवादरम्यान जातीय दंगल झाली. त्याचा परिणाम म्हणून त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. मात्र याही परिस्थितीत मुश्रीफ कागलमधून विक्रमी मतांनी निवडून आले होते. या निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माझा कार्यकर्ता निवडून आला याचा मनस्वी आनंद असल्याचा उल्लेख केला होता. या उल्लेखा विषयाचा अनुभव सांगताना मंत्री मुश्रीफ यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment