हाथरास: मायावती राजकारण करत असून योगींचा राजीनामा मागण्याचा त्यांना अधिकार नाही- रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका मुलीवर सामहिक बलात्कार झाला व त्या पीडितेचा मृत्यू झाल्याने, सर्वच स्तरातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टिप्पणी करत, मायावती हाथरस प्रकरणावरून राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

“हाथरस मधील घटना हा मानवतेवर कलंक आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि पीडितेच्या कुटुंबास न्याय दिला पाहिजे. या मुद्यावरून मायावती राजकारण खेळत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही.” असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लखनऊ येथे म्हटले आहे.

काय म्हणाल्या होत्या मायावती
हाथरस प्रकरणात मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजनीमा मागतांना म्हणाल्या होत्या कि,“माझा १०० टक्के विश्वास आहे की सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत. केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तुम्ही करू शकत नसाल तर इथं राष्ट्रपती शासन लागू केलं जावं.” असं म्हटलं होतं. तसेच, “योगीजी तुम्ही देखील एका महिलेच्या पोटातून जन्म घेतला आहे. तुम्ही महिलांचे संरक्षण करू शकत नसाल तर तुम्ही पदावरूवन स्वतःच दूर व्हायला हवं, तुम्ही स्वतःच राजीनामा द्यायला हवा.” असं देखील मायवती म्हणाल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment