Sunday, April 2, 2023

काकडीच्या सेवनाने होतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । काकडी हा थंड पदार्थ आहे त्याच वापर सगळ्यात जास्त प्रमाणात उन्हाळ्याच्या दिवसात करतात. काकडीचे उत्पन्न हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पिण्याऐवजी काकडीचा वापर केला पाहिजे. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. नमक आणि काकडी हि आरोग्यासाठी फायदेमंद आहे. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. किंवा पिवळ्या पद्धतीची लघवी होत असेल तर अश्या वेळी काकडीचा जास्त वापर करतात. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पुष्कळ दिवस एकसारखा येणारा ताप काकडीच्या बियांच्या काट्याने निघतो. काकडीच्या बियांमध्ये अनेक [पोषक घटक आहेत. त्याचा फायदा शरीराला होतो तसेच बुद्धी तल्लख राहण्यासाठी काकडीचा वापर केला पाहिजे.

— काकडी गोड , थंड ,तसेच पित्त कमी करण्यासाठी वापर करतात.

- Advertisement -

— काकडीच्या साह्याने सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते.

— शरीरातील आग व चक्कर येणे नाहीसे करते.

— काकडीचा रस बियांसह गुणकारी आहे. रिकाम्या पोटी एक ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोगी होतो. काकडीचा उष्मांक (कॅलरीज) कमी असतात. त्यामुळे स्थुलतेवर उपयोग होतो.

— काकडीचा संधीवात, मुत्रविकार, मधुमेहीसांठी

— काकडी अंगातील आग कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.

— काकडी घेत असल्यास आंबट-गोड फळे व तेलयुक्त पदार्थ त्या प्रयोगात खाऊ नये.

— शरीरावरच्या पुळ्या या कमी करण्यासाठी काकडीचा वापर करतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’