नखं खाण्याची किंवा कुरतडण्याची सवय असल्याने आरोग्यावर होतात ‘हे’ परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक राहतात त्यांना कोणत्या ना कोणत्या सवयी असतात. आपण अनेक लोकांना पाहिले असेल कि बोलता बोलता सुद्धा नखे खातात किंवा कुरडतात. जर अशी लोक एकटीच असतील आणि कोणत्या विचारात असतील तर त्यांना अश्या सवयी जडलेल्या असतात. यामध्ये लहान मुलांना कळत नाही म्हणून पण मोठ्यांना हे चुकीचे आहे हे काळात असले तरी ते हे करत असतात. आपण अनेक मोठं मोठ्या लोंकाना अनेक उत्सुकतेच्या प्रसंगी नखे खाताना बघतो तशी ही सवय अनेक जणांना असते . एका केलेल्या संशोधनामध्ये असे सांगितले आहे कि, लहान मुलं किंवा वयात येणाऱ्या मुलांमध्ये नख कुरतडण्याचे प्रमाण जास्त असते आणि जस-जसे वय वाढत जाते तसं तसे ते कमी होत जाते. परंतु प्रौढ वयाने मोठ्या असलेलेली ही सवय मानसिक स्थिती दर्शवते. याविषयी आपण अजून माहिती जाणून घेऊया

काय आहेत नखे कुरतडण्यापाठीमागची कारणे —

— मानसिक स्थिती ठीक नसणे.

–मानसिक अस्वस्थता निर्माण होते.

— सतत कोणत्या ना कोणत्या विचारात असतो. ताण-तणाव, एकटेपणा, जाणवतो.

— कोणत्याही गोष्टींचा अति विचार करणे.

— दिवसेंदिवस कमी आत्मविश्वास निर्माण होते.

— सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती राहते,

लहान मुलांमध्ये कोणत्या सवयी असतात.

अनेक वेळा लहान मुलांमध्ये असणारी असुक्षिततेची भावना निर्माण होते. तसचे कधी-कधी अगदी लहान मुलांमध्ये असणाऱ्या सवयीला काही कारण असेलच असे नाही चाळा किंवा तोंडात बोट घालायच्या सवयीमुळे किंवा कोणाची बघून लागलेली सवय असेही म्हणू शकतो. मुलं शाळॆत जायला लागली कि अभ्यासाचा ताण आंणि एकाद्या विषयाची भीती हे नखे खाण्यापाठीमागे कारण असू शकते.

आरोग्यावर होणारे परिणाम

— नखं कुरतडणे हे कमी आत्मविश्वास दर्शवते त्यामुळे व्यक्तीला कसली तरी चिंता आहे हे समजते. तसेच व्यक्ती अस्थिर मनोवृत्तीची आहे असे समजले जाऊ शकते.

— नखातील मळ, घाण पोटात गेल्याने लहान मुलांना आणि प्रौढांना देखील पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

— काहीजणांना नखांबरोबर त्याच्या बाजूची त्वचा खाण्याचीही सवय असते. यामुळे नखांना आजार होण्याची शक्यता असते.

— नखे खाताना समोरच्या व्यक्तीला किळस येऊन तुमची गणना अस्वच्छ व्यक्ती मध्ये होऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment