१ तारखेच्या लसीकरणावर आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत कोरोना लसीकरण हे महत्वाचे मानले जात आहे. देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मोफत लसीकरण करणार का? यासंदर्भात सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र लसीकरणासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. राजेश टोपे यांनी या बाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

नक्की कोणाला मोफत लास द्यायची ?

याबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्यात एक मे पासून लसीकरण करण्याचे नियोजन आहे. लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे सात हजार कोटींची लस लागणार आहे. सर्वांना मोफत द्यायची की दारिद्र्यरेषेखालील लोकांना मोफत द्यावी याचा अहवाल कॅबिनेटला दिला आहे त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल निर्णय जाहीर करतील असं राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

तसेच ऑक्सिजनचे जागतिक टेंडर काढण्यात आलेले आहे. 40,000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स,132 PSA प्लांट्स, 25 हजार मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन, 10लाख रेमडिसिवीर वाईल्स आणि जवळपास पंधरा ऑक्सिजन स्टोरेज टँकर यांचा यात समावेश असेल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लसीकरण करावे कसे ?

राज्यात लसीचा साठा गरजेचा आहे. त्यासाठी सिरम संस्था आणि भारत बायोटेकला पत्रव्यवहार केला आहे. पण त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे एक तारखेला लसीकरण कसं करावं हा मोठा प्रश्न आहे अशी चिंता राजेश टोपे यांनी बोलून दाखवली आहे. पाच लाख 34 हजार लसीकरण केला आहे. साठा असेल तर महाराष्ट्रात एका दिवसात आठ लाख लसीकरण करू शकतो आजपर्यंत दीड कोटी लोकांचा लसीकरण केलं गेलं आहे. त्यामुळे देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे 2 टक्क्यांपेक्षा कमी लस वाया गेले आहे.अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन वापरल्यास कारवाई

महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडीसीवर किती मिळालं हे जाहीर करणार आहे. ऑक्सिजनचा साठा सोळाशे १५ टन वापर करत आहोत. ऑक्सीजन कसा वापरावा याची एसओपी आज सर्व जिल्ह्यातील सरकारी आणि खाजगी डॉक्टरांना देणार आहेत. प्रत्येक हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन नर्सरी स्थापन करणार तसेच ऑक्सिजनचा पर्यायी साठा ठेवणार आहे. यासाठी सर्व हॉस्पिटल ऑक्सिजन ऑडिट करणार आहे. जर गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन वापरलं तर कारवाई केली जाईल असा इशाराही टोपे यांनी दिला आहे.

Leave a Comment