Wednesday, February 1, 2023

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 9 रुग्णवाहिकांचे उद्घाटन

- Advertisement -

औरंगाबाद | येथील जिल्हा परिषदच्या प्रांगणात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 9 रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले. आज दुपारी दोन वाजता हे उद्घाटन करण्यात आले. या रुग्णवाहिका ग्रामीण भागामध्ये धावणार असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना काळात दिलासा मिळणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून ग्रामीण रुग्णालयासाठी मोठी मदत ठरणार आहे. तसेच ज्या गरोदर महिला आहेत त्यांना घरापासून आरोग्य केंद्रापर्यंत आणि आरोग्य केंद्रापासून घरापर्यंत ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिका वापरण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील दौलताबाद, करंजखेडा, गणोरी, जातेगाव, पालोद, पानवदोड, ढाकेफळ, निलजगाव या गावामध्ये या रुग्णवाहिका सेवा देणार आहेत.

- Advertisement -

या उद्घाटनास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, अविनाश गलांडे पाटिल, किशोर बलांडे, संतोष कवडे, अनुराधाताई चव्हाण, मोनालीताई राठोड, सुधाकर शेळके आदींची उपस्थिती होती.