ओमिक्रॉन कोरोनाचा धोका!! 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार का?? राजेश टोपे म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या नव्या व्हेरींऍंट चा धोका पाहता केंद्रासाहित राज्य सरकारने देखील प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. अशा वेळी 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होऊ शकतो का असा सवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला असता त्यांनी यावर आपलं उत्तर दिले.

राजेश टोपे म्हणाले, अजून ओमिक्रॉनसंबंधी आपल्या राज्याला अद्याप भीती नाही, कारण त्याची लागण झालेली कुठे दिसत नाही. त्यामुळे एकदम चिंता बाळगण्याची गरज नाही. शाळा ठरल्याप्रमाणे १ डिसेंबरला सुरु होईल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आरोग्य मंत्रालयाला तसा प्रस्ताव पाठवला. त्यावर हिरवा कंदील देण्यात आला. सध्या या निर्णयाचा फेरविचार करण्याची शक्यता नाही. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासोबत बैठक झाली. या बैठकीत शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबर रोजीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश प्रशासनाला दिले आहे. कोरोनासाठी राज्य सरकारची संपूर्ण नवी नियमावली दरम्यान, राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे.