व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार ! अचानक आलेल्या पावसात अनेक वाहने गेली वाहून

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात ठिकठिकाणी पावसाने हाहाकार (heavy rain) माजवला आहे. नाशिक शहरात रविवारी संध्याकाळी अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसाने (heavy rain) गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. विशेष म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फक्त पार्किंगमधील वाहनंच नाहीत तर गोदा काठावरील दुकानांना देखील पुराच्या पाण्याने (heavy rain) वेढा घातला होता.

काय आहे व्हिडिओमध्ये
नाशिकच्या गोदावरी नदीला आलेल्या पुराचे (heavy rain) काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पुराच्या पाण्यात रिक्षा, चारचाकी वाहनं अडकलेली दिसत आहे. एक कार तर वाहत जावून थेट खड्ड्यात पडल्याचं दिसत आहे. काही नागरिक रिक्षा आणि इतर वाहनांना पुराच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (heavy rain) सुरु झाला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर अक्षरश: थैमान घातले आहे. या मुसळधार पावसामुळे (heavy rain) काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर