केवळ दैव बलवत्तर म्हणून …! पुराने वेढलेल्या मजुरांना दोरीच्या साहाय्याने वाचवले, पहा थरारक व्हिडीओ

नवी दिल्ली वृत्तसंस्था : यंदा पावसानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मात्र महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेशात देखील अजूनही मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसतो आहे. मध्यप्रदेश मधील भोपाळ, सागर जिल्ह्यातही तुफान पाऊस पडला आहे. या पावसामुळे मात्र एका पुलाचे बांधकाम करणाऱ्या कामगारांसोबत मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी थरारक घटना घडली.

त्याचं झालं असं की, मध्य प्रदेश मधल्या सागर जिल्ह्यातील रहली क्षेत्रात एक पूल बनवला जातो आहे. मागील काही काळापासून इथं जोरदार पाऊस पडतोय. गुरुवारी रात्री काही मजूर पुलाचं काम करण्यासाठी तिथे गेले होते. त्यांनी काम केलं आणि रात्री फुलाच्या पिलर वरच ते झोपी गेले. पण रात्रीतून एवढा मोठा पाऊस झाला आणि सुनार नदीला मोठा पूर आला. जेव्हा मजूर सकाळी उठले तेव्हा पाहिलं तर ते पूर्णपणे पाण्याने वेढले गेले होते आणि पाण्याचा स्तर हा हळूहळू वाढत होता.

सहाजिकच हे पाणी पाहून हे मजूर अत्यंत घाबरलेल्या आणि भेदरलेल्या अवस्थेत होते. काही लोकांच्या ही गोष्ट लक्षात आली त्यानंतर त्यांनी प्रशासनाला ही बाब कळवली. त्यानंतर मात्र एका दोरीची सोय केली गेली आणि या दोरीच्या मदतीने एका एका मजुराला या पुराच्या जबड्यातून बाहेर काढण्यात आले. हा थरार कॅमेरा मध्ये कैद झालाय आणि याबाबतचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने दिला आहे. सुनार नदीला आलेल्या पुरामुळे एका जागेवर काही लेकर अडकून पडली होती त्यांनादेखील सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला आहे.

You might also like