पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर पाण्याचा मोठा विसर्ग; पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पुण्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात रस्त्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू आहे. आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Dagdusheth Ganpati) गणपतीसमोरील रस्त्यावरही पाण्याचा मोठा विसर्ग चालू असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्वांनी सुरक्षित ठिकाणी थांबा, घराबाहेर पडू नका असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.

पुणे शहरात दुपारी २.३० पासून पाऊस सुरू आहे. रात्री ११ वाजेपर्यंत हवामान विभागाने केलेल्या नोंदीनुसार कात्रज भागात १४२ मि.मी, खडकवासला भागात १०८ मि.मी., वारजे येथे ६३ मि.मी व कोथरूड येथे ६७ मि.मी पावसाची नोंद केंद्रात करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या दोन दिवसांसाठी हा अॅलर्ट आहे. रात्री उशिराच्या नोंदीनुसार कात्रज भागात १०० मिमी इतका पाऊस पडला आहे.

Leave a Comment