औरंगाबाद | मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. पावसामुळे विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वे अंशतः रद्द, उशिरा सोडणे किंवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
रविवारी जोरदार पावसामुळे नांदेड-मुंबई तपोवन उशिरा धावली. तर जालना-सीएसटीएम जनशताब्दी जनशताब्दी पूर्णपणे रद्द करण्यात आली. सोमवारी पावसाचा अंदाज घेऊनच पुढील वेळापत्रक ठरवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
प्रवाशांनी अधिकची माहिती घेऊनच रेल्वे प्रवास सुरु करावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी सेनाच्या वतीने अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी केले आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी 09158888159, 09673008621या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.