राज्यपाल कोश्यारींना उच्च न्यायालयाची दुसऱ्यांदा नोटीस; नेमकं प्रकरण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी राज्यपालांविरोधात याचिका दाखल केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, उच्च न्यायालयाने उच्च शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवांना नोटीस बजावून चार आठवडयात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. हा संपूर्ण वाद निवृत्ती वेतनासंदर्भातील असल्याने डॉ. वंजारी या नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या प्राध्यापक होत्या. जुलै 2016 मध्ये त्यांची निवड ही एसएनडीच्या कुलगुरू म्हणून झाली. कुलगुरू म्हणून त्यांनी येथील कार्यकाळ पूर्ण करून त्या 2021 मध्ये निवृत्त झाल्या. परंतु एक वर्ष होऊनही त्यांना निवृत्त वेतनाचा लाभ मिळाला नाही.

अनेक शासकीय कार्यालयात चकरा मारल्यावर त्यांना केवळ प्रोफेसर दर्जाचे निवृत्त वेतन लागू करण्यात आले. मात्र, डॉ. वंजारी कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यामुळे त्यांना कुलगुरू पदाला लागू होणारे निवृत्त वेतन द्यावे, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेबाबत उच्च न्यायालयाने राज्यपाल कोश्यारींना नोटीस बजावली आहे.