व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

इम्रानच्या दाव्यांनंतरही पाकिस्तानमध्ये चाकूने वार करून करण्यात आली हिंदू डॉक्टरची हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इम्रान खान यांनी सर्व दावे करूनही पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू सुरक्षित नाहीत. पाकिस्तानमध्ये आणखी एका हिंदू डॉक्टरची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लाल चंद बागरी असे या डॉक्टरचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. सिंध प्रांतातील टंडो अलिहार येथे बागरी यांना घरात ठार मारण्यात आले. डॉनच्या म्हणण्यानुसार काही अज्ञात लोक त्याच्या घरात घुसले आणि चाकूने अनेक वार केल्यावर त्याचा गळा कापला गेला.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी खासदार रमेशकुमार वंकवाणी यांनी घटनेची पुष्टी केली आहे. अंगावर अनेक वार झाल्यामुळे असा संशय व्यक्त केला जात आहे की,ही बाब वैयक्तिक विरोध किंवा धार्मिक हत्यांशी संबंधित असू शकते. गेल्या एका वर्षात पाकिस्तानमधील हिंदू डॉक्टरची ही दुसरी हत्या आहे. गेल्या वर्षी कराचीजवळील लारकाना येथील गर्ल्स हॉस्टेलमध्ये डॉ. नम्रता चांदानी यांचा मृतदेह सापडला होता. बलात्कारानंतर नम्रताची हत्या झाल्याचे पोस्टमॉर्टम अहवालातून स्पष्ट झाले होते.

पोलिसांनी सांगितले – सध्या तपास करत आहे
सोमवारी सायंकाळी काही लोक डॉ बागरी यांच्या घरात घुसले आणि त्यांच्यावर अनेक वार केले. यानंतर या अज्ञात लोकांनी बागरीचा गळा कापला आणि ते तेथून फरार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागरीच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. टंडो अलिहार हे सिंध प्रांतामधील एक शहर आहे आणि येथे बहुतेक ठिकाणी सिंधी समाज राहत आहे. लालचंद हेसुद्धा सिंधू समाजातील असून त्यांचे क्लिनिक घरीच होते.

नम्रता चांदनी यांच्या हत्येचे गूढ अजूनही उकलले नाही
गेल्या वर्षी 16 सप्टेंबरला डॉ. नम्रता चांदनी यांचा मृतदेह लारकानाच्या मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात सापडला होता. ती बेनझीर भुट्टो यांच्या कुटुंबीयांद्वारे चालवलेल्या बीबी आसिफा मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी होती. नम्रताचा भाऊ विशाल हा कराचीचा मोठा सर्जन मानला जातो. तिच्या पोस्टमार्टम अहवालातून हे स्पष्ट झाले की, नम्रताला ठार मारण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केला गेला होता. याप्रकरणी दोन जणांना अटकही करण्यात आली. मात्र, नंतर त्यांना सोडण्यात आले. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने नम्रताला न्याय देण्याची मागणी केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.