पाकिस्तानमध्ये एका हिंदू महिला शिक्षिकेला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले, नाव बदलून ठेवले आयेशा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इस्लामाबाद । पाकिस्तानात (Pakistan) बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरण (Forcrfully Coversion into Islam) करणे सुरू आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख आणि ख्रिश्चन मुलींचे जबरदस्तीने धर्मांतरण करून लग्न करण्यास भाग पाडले जात आहे. ही घटना 6 जानेवारी 2021 ची आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बलुचिस्तानच्या एकता कुमारीसोबत ही घटना घडली आहे. ती शाळेत शिकवते. तिने जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. या घटनेबाबत स्थानिक प्रशासनाने मौन बाळगले आहे. अलीकडेच याबाबतीत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता, त्यानुसार पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे 1000 अल्पसंख्याक मुलींचे सक्तीने धर्मांतर केले जात आहे.

मियां मिट्टू यांनी एकताचे इस्लाममध्ये धर्मांतरण केले
पाकिस्तानचे सामाजिक कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनीही ट्विटद्वारे एकताचे छायाचित्र आणि तिच्या धर्मांतरणाचे प्रमाणपत्रही शेअर केले आहे. सिंधच्या घोटकीच्या बरझुंदी शरीफ धारकी येथील मियां मिट्टू यांच्या माध्यमातून एका प्राथमिक शाळेची हिंदू शिक्षिका एकता कुमारी हिने इस्लाम कबुल केला असल्याचे त्यांनी लिहिले आहे. आता एकताचे नाव बदलून आयशा असे करण्यात आले. एकताच्या वडिलांचे नाव अनिल कुमार आहे.

https://twitter.com/voice_minority/status/1347411421932494851?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347411421932494851%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fworld%2Fpakistan-hindu-female-teacher-ekta-converted-in-islam-nodsm-3409320.html

व्हॉइस ऑफ मायनॉरिटी नेही याबाबत चिंता व्यक्त केली
आणखी एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे ट्विट व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटीच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केले गेले आहे. या पोस्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, सक्तीने धर्मांतरण करणे पाकिस्तानमध्ये सामान्य झाले आहे. मियां मिट्टू यांनी 6 जानेवारी रोजी प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाचे इस्लाम धर्मात धर्मांतरण केले. चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, एक दिवस असाही येईल की, ध्वजातील पांढर्‍या रंग पूर्णपणे अदृश्य होईल. पाकिस्तानच्या ध्वजातील पांढरा रंग अल्पसंख्याकाना दर्शविते.

असे सांगितले जात आहे की, मियां मिट्टूने या भागातील अनेक अल्पसंख्याक मुलींचे धर्मांतरण केले आहे. अलीकडेच मियां मिट्टू यांनी कविता कुमारी यांनाही इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. सन 2019 मध्ये मिट्टूने मेहक केसवानी आणि दोन अल्पवयीन बहिणी रवीना आणि रीना यांचे अपहरण केले आणि त्यांचे इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. मियांवर आतापर्यंत जबरदस्तीने धर्मांतरण करण्याची 117 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. मात्र, अजूनही त्याच्याविरूद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेलेली नाही. तो अत्यंत प्रभावशाली व्यक्ती आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबतची त्याची अनेक छायाचित्रेही अनेकदा दिसून आलेली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment