बाबरी खटला निकालाआधी संजय राऊतांच मोठं वक्तव्य, म्हणाले..

मुंबई । बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज निकाल देणार असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राम मंदिराची जमीन राम मंदिर ट्रस्टला देण्यात आली, ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केलं तेव्हाच बाबरीसाठी विशेष न्यायालयाचं महत्त्व संपलं असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

बाबरी प्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी आहेत. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आरोपींमध्ये उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांचाही समावेश आहे.

बाबरी प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “राम मंदिराची जमीन राम मंदिर ट्रस्टला देण्यात आली, ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केलं तेव्हाच बाबरीसाठी विशेष न्यायालयाचं महत्त्व संपलं. जर कायदेशीर भूमिपूजन झालं आहे तर बाबरी केसच संपते. त्या न्यायालयाला आणि खटल्याला काही महत्व राहिलं नाही”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like