व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Home : बुकिंग रद्द केल्यास घर खरेदीदारांना होणार नाही जास्त नुकसान, RERA ने बिल्डर्सना दिले ‘हे’ आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home : नवीन घर घेण्यासाठी बुकिंग करून जर ते कोणत्याही कारणास्तवरद्द केले तर आता बिल्डर्सना घर खरेदीदारांकडून जास्त रक्कम घेता येणार नाही. रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीकडून (RERA) सर्व बांधकाम व्यावसायिकांना यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे.

MahaRERA: Maharashtra RERA, Registration, Fee & Documents

महाराष्ट्र RERA नुसार, आता घरांचे बुकिंग रद्द केल्यानंतर खरेदीदाराला एकूण किंमतीच्या फक्त 2 टक्केच रक्कम बिल्डरला द्यावी लागेल. आतापर्यंत ही रक्कम 10 टक्के होती. कल्पतरू अवाना या लक्झरी रिअल इस्टेट प्रकल्पाच्या डेव्हलपर्सना दिलेल्या आदेशात, RERA ने म्हटले की,” घर खरेदीदार आणि डेव्हलपर्स यांच्यातील करारामध्ये बुकिंग रद्द करण्याच्या बाबतीत 10 टक्के रक्कम आकारणे पूर्णपणे अवास्तव आहे.” Home

3 bhk apartment Online Sale, UP TO 58% OFF

प्रकल्पामध्ये उशीर झाल्यानंतर सुरू झाला वाद

महाराष्ट्र RERA मध्ये घर खरेदीदारांकडून ऑगस्ट 2020 मध्ये तक्रार करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांचे पैसे व्याजासह परत करण्याची मागणी केली गेली. खरेदीदारांनी सांगितले की,” त्यांनी कोणत्याही विक्री आणि खरेदी डॉक्युमेंट्सवर स्वाक्षरी केलेली नाही, मात्र 2015 मध्ये LOI वर स्वाक्षरी केली होती जे एक अलॉटमेंट लेटर होते. यामध्ये फ्लॅट मिळण्याच्या तारखेचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता, मात्र त्यासाठी 3 वर्षांचा कालावधी पुरेसा असल्याचे सांगण्यात आले होते. Home

जुलै 2020 मध्येच घर खरेदीदारांकडून प्राधिकरणाला कळवण्यात आले होते की,” त्यांना या प्रकल्पात रस नाही आणि ते यातून माघार घेऊ इच्छित आहेत. यासोबतच डेव्हलपर्सना दिलेले पैसेही त्यांना व्याजासह परत हवे आहेत. मात्र, डेव्हलपर्सना ऑक्टोबर 2021 मध्ये या फ्लॅटचे ऑक्‍यूपेशन सर्टिफिकेट मिळाले. Home

DDA launches special housing scheme. Number of flats, price, location | Latest News Delhi - Hindustan Times

डेव्हलपर्सने काय दावा केला ???

कल्पतरू डेव्हलपर्सने देखील सर्टिफिकेट मिळाल्यानंतर अनेक तक्रारी देखील केल्या, ज्यामध्ये घर खरेदीदारांनी विक्री-खरेदी करारावर स्वाक्षरी करून उर्वरित रक्कम व्याजासह देण्याची मागणी केली. मात्र , RERA ने डेव्हलपर्सचा हा युक्तिवाद स्वीकारला नाही. यावेळी त्यांनी सांगितले की,” घर खरेदीदारांनी त्यांचे बुकिंग रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. ग्राहकांच्या तक्रारीनंतर डेव्हलपर्सनी त्यांच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे घर खरेदीदारांना या प्रकल्पामध्ये राहण्याची सक्ती करता येणार नाही. तसेच, डेव्हलपर्स घराच्या एकूण किंमतीपैकी फक्त 2% कास्ट चार्ज म्हणून वजा करू शकतात. Home

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://maharera.mahaonline.gov.in/

हे पण वाचा :

HDFC Bank कडून ग्राहकांना धक्का !!! होम लोन वरील व्याजदरात केली वाढ

‘या’ Multibagger Stock मध्ये फक्त 15 हजार रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदार बनले करोडपती !!!

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत घसरण; पहा नवे दर

Flight Booking : ‘या’ टिप्स वापरून स्वस्तात बुक करा फ्लाईट्सचे तिकीट !!!

Wipro : ‘या’ IT कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले करोडो रुपये !!!