गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; ‘त्या’ ई -मेल मुळे एकच खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जिवाला धोका आहे. मुंबई येथील केंद्रीय सेवा बलाच्या मुख्य कार्यालयाला एक ईमेल आला आहे. ई-मेल मध्ये लिहिले आहे की गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना येणाऱ्या दिवसात जिवे मारण्यात येईल.

ई -मेल मध्ये लिहिले आहे की धार्मिक स्थळावर या नेत्यांवर हल्ला केला जाईल. हा ई – मेल आल्यानंतर मात्र मुंबईतील केंद्रीय सेवा बलाच्या कार्यालयात एकच खळबळ माजली. या ई -मेल मुळे CRPF बरोबरच इतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा ई मेल मंगळवारी ( 6 एप्रिल ) रोजी सकाळी CRPF च्या कार्यालयाला मिळाला आहे.

दरम्यान,’आम्ही महाराष्ट्र आणि केंद्राच्या संबंधित एजन्सींना ईमेल पाठविला आहे. ते त्यावर काम करत आहेत आणि आम्ही त्यांच्या सूचनांनुसार काम करू’ अशी माहिती सीआरपीएफचे डीजीपी कुलदीप सिंग यांनी दिली आहे. यापूर्वी देखील अमित शहा योगी आदित्यनाथ यांच्यासहित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील मुख्य नेत्यांना जीवे मारण्याची धमक देणारे पत्र प्रजासत्ताक दिनाला मिळाले होते.

दरम्यान याच वर्षाच्या जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. डायल 112 च्या व्हॉट्स अॅपवर आलेल्या मेसेजमध्ये असे लिहिले होते की, “मी तुला 24 तासांच्या आत मारून टाकीन, जर मला शोधू शकाल तर शोधा मी 24 तासांच्या आत एके-47 ने तुम्हाला मारून टाकीन.” या संदेशानंतर पोलिसांनी आरोपीला आग्रा येथून अटक केली. आरोपी अल्पवयीन होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

You might also like