महाराष्ट्र पोलिस सक्षम, पोलीस तपासानंतर सत्यता समोर येईल- दिलीप वळसे पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच या दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलची रेकी करण्यात आली असल्याचे देखील समजत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हा विषय संवेदनशील आहे असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हंटल. त्यामुळे राजकारणाचा विषय नाही. यातील वस्तुस्थितीची माहिती सर्वांना मिळावी यासाठी एटीएसचे प्रमुख आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. असे वळसे पाटील यांनी सांगितले. पोलिसांना चौकशीबाबत संपूर्ण स्वातंत्र्य असून ते त्यांच्या पद्धतीनं तपास करत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करु द्यायला हवं असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तरप्रदेश मध्ये घातपात करण्याचा दहशतवाद्यांच्या कट होता असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी दाऊद आणि आयएएसआय ची संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment