आताचे गृहमंत्री नक्षली भागात ‘फक्त पुष्पचक्र’ वाहायला जातात – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
प्रतिनिधी । आमचे सहकारी स्व. आर. आर. पाटील गडचिरोलीचे नसतानाही या विभागाचे पालकमंत्रीपद द्या, असा आग्रह धरला होता. दर महिन्यांतून त्यांच्या एक-दोन चकरा तरी गडचिरोलीत असायच्या. भामरागडच्या आतल्या भागात राज्याचे गृहमंत्री लोकांना धीर द्यायला मोटरसायकलवर जात होते. एक गृहमंत्री तिथल्या लोकांचा, अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विकास कामाला गती देण्यासाठी, नक्षल गतिविधी थांबाव्यात म्हणून जीवापाड मेहनत घेतो आणि दुसरा आताचा गृहमंत्री या भागात फक्त पुष्पचक्र वाहायला जातो. खरं तर या मुख्यमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकारच नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सहकाऱ्यांच्या एका विशेष बैठकीत बोलतांना केली.
यावेळी पवार म्हणाले, माझ्याकडे जेव्हा राज्य सरकारची जबाबदारी होती तेव्हा पोलिस अधिकारी व आयएएस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न केवळ कायदा सुव्यवस्थेचा नसून विकासाच्या बाबतीत एखादा परिसर मागे राहिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून निर्माण झालेला आहे हे लक्षात आणून दिलं होतं. यातून निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेचा फायदा घेणारी नक्षल प्रवृत्ती त्यामुळे पुढे आली. त्यांना विकासही नको आणि परिस्थिती तशीच राहावी ही त्यांची अपेक्षा आहे. त्यावेळी अंदाजपत्रकात गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी आम्ही स्वतंत्र विकासाचं बजेट दिलं होतं.  

Leave a Comment