भंडाऱ्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात! 2 जणांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात (accident) झाला आहे. हा अपघात भंडारा साकोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 मोहघाट जंगल परिसरामध्ये घडला आहे. या अपघातात ट्रॅव्हल्समधील चालक क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळच्या सुमारास हा अपघात (accident) घडला आहे. या भीषण अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतून खोळांबली आहे. या अपघातात (accident) चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाल्याने स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

काय घडले नेमके ?
रायपूरवरून निघालेली हंसा ट्रॅव्हल्स नागपूरकडे भरधाव जात असताना तिने उभ्या असलेल्या ट्रकला भीषण धडक(accident) दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात (accident) ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात (accident) जखमी झालेल्या ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना साकोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकऱ्यांच्या दिंडीत कवठेमहांकाळ तालुक्यातल्या केरेवाडी या ठिकाणी जीप गाडी घसरल्याने अपघात (accident) घडला होता. ज्यामध्ये 17 वारकरी हे गंभीर जखमी झाले होते.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment