काॅलेजवरुन ट्रिपल सीट घरी येत होत्या तरुणी; अपघातात एकीचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती : हॅलो महाराष्ट्र – बारामती तालुक्यातील मोरगाव येथे तीन महाविद्यालयीन तरुणींचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात झाला आहे. या अपघातात ऋतुजा दिपक तावरे या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्या दुचाकीवरील रुपाली अरुण कौले व अंकीता विष्णु तावरे या गंभीर जखमी झाल्या आहेत. या तिघी मैत्रिणी सुपा येथील विद्या प्रतीष्ठानमध्ये शिकत आहेत.

बारामती तालुक्यातील विद्या प्रतीष्ठानच्या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्गात ऋतुजा दीपक तावरे, अंकीता विष्णू तावरे आणि रुपाली अरुण कौले या शिकत आहेत. काल महाविद्यालयातून सुटल्यानंतर त्या आपल्या दुचाकीवरुन मोरगावला येत असताना सुपा-मोरगाव या रस्त्यावरील राजबाग पाटीजवळ आल्या असता अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

या अपघातात मोरगाव जवळील शेराचीवस्ती येथील ऋतूजा दिपक तावरे या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर बाकी 2 मैत्रिणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी मोरगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave a Comment