Monday, January 30, 2023

महाबळेश्वरला पर्यटक महिलेचा विनयभंग करून घोडेचालकांची पतीला चाबकाने मारहाण

- Advertisement -

पाचगणी प्रतिनीधी | सादिक सय्यद

महाबळेश्वर येथे फिरावयास आलेल्या पर्यटक महीलेच्या दंडाला धरुन ओढून लज्जा उत्पन्न असे वर्तन केल्याची तक्रार पोलिसांत नोंद झाली आहे. त्याचा जाब विचारल्या प्रकरणी चाबुक, लाथाबुक्क्यानी मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महाबळेश्वर येथील दोन घोडे चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जावेद गणी खारकंडे (वय-44 वर्षे रा.गवळी मोहल्ला, महाबळे) व श्वरजुबेर याकुब वारुणकर (वय- 31 वर्षे रा. राजंणवाडी ता. महाबळेश्वर) असे गुन्हा नोंद झालेल्या घोडा चालकांची नांवे आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जावळी तालुक्यातील 32 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की वेण्णालेक परिसरात महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी आले असताना, सांय. 5.15 वाजण्याच्या सुमारास जावेद गणी खारकंडे याने महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे डाव्या दंडाला धरुन ओढले.

यावेळी खारकंडे यांना जाब विचारला असता याचा त्याने राग येवून त्याचे सोबत इतर 4-5 जणांनी महिलेच्या पती, पुतणे यांना चाबुकाने, लाथाबुक्क्यानी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली. महिलेच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली हवलदार शेलार करत आहे.