कोल्हापूरमध्ये प्लास्टिक मुक्तीसाठी हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
प्लास्टिकमुक्त शहरासाठी महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला कोल्हापूर हॉटेल असोसिएशने सहकार्याची भूमिका घेतली असून. प्लास्टिकऐवजी अन्य वस्तूंचा वापर करण्यास प्राधान्य दिले जाईल’ अशी ग्वाही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. हॉटेल अॅट्रिया येथे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत बैठक झाली यावेळी हॉटेल असोसिएशने आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी पूर परिस्थितीमध्ये हॉटेल असोसिएशनने दिलेल्या योगदानाबद्दल आयुक्तांनी आभार मानले. आयुक्तांनी प्लास्टिकच्या कोणत्या उत्पादनावर बंदी आहे याची माहिती दिली. निसर्गनिर्मित वस्तूंचा उपयोग करण्याचे आवाहन केले. अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी प्लास्टिकमुक्तीसाठी महापालिकेला सहकार्याची भूमिका दिली.

सह्याद्री हॉटेलचे मालक सुशांत पै यांनी प्लास्टिक बंदीमुळे आलेल्या अडचणींचा उहापोह करत प्लास्टिकचा वापर न करण्याची ग्वाही दिली. तर पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी प्लास्टिकमुक्तीच्या सरकारच्या निर्णयांची माहिती दिली. अनिल चौगुले यांनी प्लास्टिकला पर्याय म्हणून इतर पर्याय सुचवले. यावेळी माहिती शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार, पर्यावरण अधिकारी अपेक्षा सूर्यवंशी यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन शानबाग यांनी आभार मानले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment