[सिनेमा रीव्हू ] हाऊसफुल 4 पूर्वजन्मावर आधारित चित्रपट;  चित्रपटात अ‍ॅक्शनबरोबरच कॉमेडीचा डोस

बॉलीवूड खबर । दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हाऊसफुल 4 रिलीज झाला . बॉलिवूडसाठी दिवाळी व इतर महत्वाचे सण खूप शुभ मानले जातात. हाऊसफुल चित्रपट सिरीज नेहमीच हिट ठरली असून चित्रपटाचा चौथा सिक्वेलही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे. पहिल्या तीन हाऊसफुल चित्रपटांच्या तुलनेत मात्र ह्या चित्रपटामधील कहाणी ही जरा वेगळी व काहीशी कमकुवत वाटेल अशीच आहे. अक्षयकुमार , रितेश देशमुख , चंकी पांडे आणि जॉनी लीव्हर यांच्या कॉमेडीने या चित्रपटाची सूत्रे हाती घेतली आहेत.
चित्रपटाची कहानी – हाऊसफुल 4 हा पूर्णपणे पुनर्जन्मावर आधारित विनोदी चित्रपट आहे. चित्रपटाची सुरवात लंडनमध्ये सुरू होतो , पण नंतर ही कथा ६०० वर्षांपूर्वी च्या घडामोडींमध्ये घेऊन जाते. लंडनचा हॅरी (अक्षय कुमार) बाला म्हणून दाखविला गेला आहे. बाला माधवगडचा राजपुत्र आहे. बाला हा खोडकर व बर्‍याच कमतरतानी दाखवलेला आहे, ज्यामुळे त्याचा राजा म्हणजेच त्यांचे वडील त्याच्यावर रागावले असतात . त्यामुळे अक्षय कुमारला वडिलांनी त्यांच्या राज्यातून काढून टाकले. वडिलांकडून झालेल्या ह्या अपमानाचा सूड घेण्यासाठी अक्षयकुमार सीतमगडला जाऊन थोरल्या राजकन्या मधु (क्रिती सॅनॉन) बरोबर लग्न करायचं ठरवतात. मग याच ठिकाणी बंगारू (रितेश देशमुख) नर्तक भेटतो आणि त्याच्या मिशनमध्ये त्याचा समावेश करतो. राजकुमारी मधुचा रक्षक धर्मपुत्र (बॉबी देओल) याच्याशीही मैत्री करेल. राजकुमारीच्या दोन बहिणीही धर्मपुत्र आणि बंगारूच्या प्रेमात पडतात, परंतु त्यांचे प्रेम कठीण होते. गामा (राणा डग्गुबत्ती ) त्याच्या प्रेमकथेत खलनायक बनतो. लंडन वरून अक्षय कुमार व इतर सीतमगढला गेल्यानंतर मग मागील पूर्वजन्माचा प्रवास चालू होतो. एक एक गोष्ट हि मागील आठवत जाते व चित्रपट याप्रकारे पुढे पुढे सरकत जातो.
इंटरवलं नंतर हाऊस फुल 4 मध्ये भरपूर कॉमेडी आहे, मात्र कथा कमकुवत असल्यामुळे जास्त उत्सुकता कोणत्या सिन बाबत राहत नाही. या चित्रपटात अ‍ॅक्शनबरोबरच कॉमेडीचा डोसही आहे. दिग्दर्शक म्हणून फरहाद समजीने चांगली कामगिरी केली. कॅमेर्‍याचे कार्य बर्‍यापैकी चांगले आहे आणि शॉट्स देखील विस्तृत श्रेणीत आहे. अक्षय कुमार, रितेश व जॉनी लिव्हर यांनी चित्रपटात जबरदस्त विनोदी काम केले आहे. बॉबी देओलचे कामही चांगले आहे. कृती सेनन , कृती खरबंदा आणि पूजा हेगडे यांची कामगिरी चांगली आहे.


चित्रपट – हाऊसफुल 4
दिग्दर्शक – फरहाद समजी
निर्मिती – फॉक्स स्टार स्टुडिओज

कलाकार – अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, कृती सेनन, कृती खरबंदा, पूजा हेगडे, जॉनी लीव्हर, चंकी पांडे