‘या’ २० जणांमुळे झाला हजारोंना कोरोना! जाणून घ्या अमेरिकेत कोरोना कसा आला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बोस्टन । अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू आहे. अमेरिकेत ५ लाख ८० हजारांहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला असून मृतांची संख्या २३ हजारांहून अधिक झाली आहे. न्यूयॉर्कमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या ही चीनपेक्षाही अधिक झाली आहे. अमेरिकेत कोरोना नक्की कसा आला याबाबत आता शोध घेतला जात आहे. यामध्ये एका औषध कंपनीच्या कर्मचाऱ्यांमुळे अमेरिकेतील काही राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या कंपनीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कंपनीचे सीईओ वोटनोस यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तयार करण्यात आलेल्या अल्जायमरबाबतच्या औषधाबाबत सांगण्यासाठी एका परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत उपस्थित असलेल्या बायोजेन कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. याची माहिती त्यांनादेखील नव्हती. या परिषदेत उपस्थित असणाऱ्या काहींना करोनाची बाधा झाली असावी. ही परिषद संपल्यानंतर उपस्थित असलेले आपल्या राज्यात पुन्हा गेले. या परिषदेनंतर हे करोनासंक्रमित अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांसह विमान प्रवास केला. त्यांनी अमेरिकेतील इंडियाना, टेनेसी आणि उत्तर कॅरोलिना आदी राज्यांमध्ये दौरा केला. त्यांच्या संपर्कातून जवळपास २० करोनाबाधितांमुळे २० हजारजणांना संसर्ग झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एका वृत्तानुसार, या करोनाबाधित अधिकाऱ्यांमुळे कमीत कमी सहा राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला. मॅस्साचुसेट्स राज्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इंडियानामध्ये करोनाशी संबंधित आढळलेले पहिले दोन रुग्ण हे बायोजन कंपनीचे कर्मचारी होते. पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे अमेरिकेत करोनाचा संसर्ग वाढला असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment