महिलांच्या क्वारंटाईन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतातच कसे? बलात्काराच्या घटनेने चित्रा वाघ यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । देशात कोरोनाचे संकट वाढले आहे. सर्व ग्रामीण आणि शहरी भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.सर्व ठिकणी विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. काही दिवसांपूर्वी पनवेलमधील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर महिलेने याविरोधी तक्रार दाखल केली होती. कोरोनाच्या संकटासोबत बलात्काराची घटना हि दुर्देवी आहे . राज्यामध्ये महिलांसाठी असलेल्या दिशा कायद्याचे काय झाले? कि ती फक्त घोषणाच होती असा संतप्त सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेला संबोधीत केला आहे.

आरोपी आणि पीडिता दोघेही करोनाबाधित असून त्यांना काही दिवसापूर्वी क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. पनवेल क्वारंटाइन सेंटर मध्ये घडलेली घटना हि कोरोनापेक्षाही भंयकर आहे. त्या घटनेनंतर आरोपीला अटक केली आहे. यापूर्वी अश्या सेंटर मध्ये अनेक वेळा महिलांच्या. बाबतीत विनयभंगाचे प्रकार घडले आहेत . महत्त्वाची बाब म्हणजे महिलांच्या क्वारंटाइन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतातचं कसे ? सुरक्षा यंत्रणा, प्रशासन काय करत असते ? क्वारंटाइन सेंटर मध्ये दाखल केलेल्या महिलांच्या सुरकक्षेचे काय? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे .

क्वांरटाइन सेंटरच्या सुरक्षेसाठी आणि तेथे असलेले सुरक्षारक्षक, तिथले प्रशासनही तितकेच जबाबदार या घटनेसाठी आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिला रुग्ण सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षेसाठीच्यादिशा कायदा तयार करण्यात आला होता. ‘दिशा कायद्या’चं काय झालं की ती फक्त मतदारांसाठी घोषणाच होती,” अशी विचारणाही त्यांनी ठाकरे सरकारला केली आहे.पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील करोनाबाधित रुग्ण आणि करोना संशयितांना पनवेल क्वांरटाइन सेंटर मध्ये दाखल करण्यात येते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment