Sunday, April 2, 2023

सेवानिवृत्त मद्यधुंद डाॅक्टरच्या गाडीवर महाराष्ट्र शासन कसे ?

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील संगम हाँटेल समोर भरदिवसा चारचाकी मारूती सुझुकी कंपनीची सियाझ कारचा आपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या गटरमध्ये चारचाकी गाडी  गेल्याने जवळपास असलेली लोक मदतीसाठी सरसावले. परंतू गाडी जवळ जाताच सर्वजण चकित झाले. तसेच गाडीचालक सेवानिवृत्त सरकारी डाॅक्टर मद्यधुंद अवस्थेत होते. गाडीवर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड कसा असा सवाल लोकांच्याकडून केला जात होता.

- Advertisement -

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर नाका येथे एका गटारमध्ये चारचाकी गाडी गेलेली होती. तेव्हा गाडीचा अपघात झाल्याने तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. गाडीतील व्यक्तीला आधार देण्यासाठी पुढे गेले असता, गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. अपघातातील गाडीमध्ये महाराष्ट्र शासन, अत्यावश्यक सेवा, आरोग्य विभाग असे बोर्ड मिळून आले. गाडीतील मद्यधुंद अवस्थेत असलेले गाडी चालक एका ग्रामीण रूग्णालयातील सेवानिवृत्त डॉक्टर होते. अपघातात डॉक्टर हे किरकोळ जखमी झालेले आहेत.

संबंधित ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलिस हजर होऊन सदरचे वाहन क्रेनच्या सहाय्याने गटारीबाहेर काढून संबंधित डॉक्टर यांच्या ताब्यात दिले. परंतू सेवानिवृत्त असूनही गाडीवर महाराष्ट्र शासन बोर्ड लावलाच कसा? यांना परवानगी दिली कोणी? तसेच या कोरोना संकटातून बचावासाठी आणि सुविधा मिळवण्यासाठी जिल्ह्यातील किती असे बोगस बोर्ड गाडीतून फिरत असतील? अशी चर्चा सुरू होती.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group