नरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं ‘वाटोळं’ करणारी ठरेल, कारण..

थर्ड अँगल | असीम अली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते कारणीभूत असणाऱ्या त्रासासाठी कोणत्याही प्रकारची राजकीय राजकीय किंमत मोजावी लागणार नाही. ते अगदी इराणच्या अली खामेनेई सारखे आहेत.  अनेकांना आश्चर्य वाटते आहे की, मोदींनी त्यांच्या आत्मनिर्भर भारत भाषणात स्थलांतरित कामगारांचे संकट आणि गमावलेल्या नोकऱ्यांबद्दल काहीच कबुली दिली नाही. तरीही त्यांच्याविषयी कोणताच राग नाही आहे. जर ते एक सामान्य राजकारणी असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आतापर्यंत किमान बिंदूवर जाऊन पोहोचली असती. एका सर्वेक्षणानुसार तीन पैकी दोन भारतीयांना २४ मार्च रोजी घोषित झालेल्या संचारबंदीमुळे नोकरी गमवावी लागली आहे. दोन महिन्याहून अधिक काळ सुरु असणाऱ्या या संचारबंदीमध्ये स्थलांतरितांच्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकार नेत्रदीपकपणे अपयशी ठरले आहे. संचारबंदी सुरु झाल्यापासून अर्ध्या भारतीयांच्या कुटुंबातील जेवणात कमतरता आली आहे. तरीही, मोदींवर कोणत्याच प्रकारचा राग दिसून येत नाही आहे, ते पूर्वी इतकेच लोकप्रिय आहेत ही आश्चर्याची बाब आहे. अनेकांना आश्चर्य वाटते की, १२ मे रोजी जेव्हा पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले होते, तेव्हा त्यांनी स्थलांतरितांच्या संकटाबद्दल एकदाही उल्लेख केला नाही किंवा त्यांना सहानुभूतीही दिली नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणातील नोकऱ्यांचा तोटा, जीवनावश्यक वस्तूंची कमतरता अगदी या उदासीन वातावरणाचाही उल्लेख केला नाही. अगदी २०१६ साली केलेल्या नोटबंदीनंतर झालेल्या आजिविकेच्या नाशानंतर जसे ते काहीच बोलले नव्हते तशा परिस्थितीत कोणताच राजकारणी नेता टिकला नसता. अनेक त्रासाच्या कारणांमध्ये मोदींना कोणतीच राजकीय किंमत मोजावी लागत नाही, असे कसे? आणि लोकांच्या त्रासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करूनही लोकांमध्ये त्यांची प्रतिमा गर्विष्ठ, केवळ क्रूर अशी कशी होत नाही? 

मोदी त्यांच्या साध्या राजकीय विश्लेषणात गोंधळ घालतात कारण त्यांचे आवाहन केवळ राजकीय नसते. त्यांचे आवाहन हे मेसिऍनिक संदर्भासारखे अर्ध- धार्मिक असते. राजकीय शास्त्रज्ञ Morris Jones भारतीय राजकारणाला “saintly idiom” म्हणून संबोधतात. मोदी एम.के गांधींसारखे असेच प्रतिनिधित्व करतात. ते स्वतःचे वर्णन कुटुंब आणि भौतिक सुखापासून दूर असणारा फकीर म्हणून करतात, जे भारताचे केवळ राजकीयच नाही तर सामाजिक, नैतिक आणि अध्यात्मिक नेतृत्व करण्यासाठी या ठिकाणी आहेत. म्हणूनच ते अनुसरण नाही तर भक्ती निर्माण करतात. आणि ही भक्तीच ते नेतृत्व करत असलेल्या सरकारची प्रतिरक्षित (Immune) आहे.    

लोकांचा त्रास मोदींवरील विश्वासाची चाचणी आहे 
जेव्हा तुम्ही दुःखात असता, तेव्हा तुम्ही मसीहाला काढून टाकत नाही अगदी जसे देवाला काढून टाकत नाही. तुम्ही तुमचा विश्वास दुप्पट करता कारण देव तुम्हाला सांगतो की  तुम्ही जे सहन करत आहात ते एका उच्च कारणासाठी आणि तिथपर्यंत तरून जाण्याचा मार्ग काटेरी आहे आणि याचे मार्गदर्शन केवळ देवच तुम्हाला करू शकतो. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा उल्लेख करताना ते म्हणाले होते. ही एका मोठ्या कारणासाठीची तपस्या आहे, अगदी नोटबंदीच्या वेळी जसे ते ‘भ्रष्टाचाराच्या विरोधातील यज्ञ’ असे म्हणाले होते. १४ एप्रिल जेव्हा संचारबंदी वाढविण्याची घोषणा त्यांनी केली तेव्हाही त्यांनी त्याग, तपस्या अशा अध्यात्मिक शब्दांचा वापर केला होता. गांधींनी लोकांना त्याग आणि आत्मशुद्धीकरणातून स्वातंत्र्य मिळेल असे सांगितले होते. जे सत्याग्रहाचे मूळ होते. मोदींनी लोकांना सांगितले की, ते त्यांच्या त्याग आणि तपश्चर्येवर स्वयंनिर्भर भारत अर्थात आत्मनिर्भर भारत बनवतील. म्हणूनच त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात भारताच्या प्राचीन महानतेच्या अभिवादनाने केली. एका विशिष्ट नैतिक विश्वात मोदी मसीहा आहेत. या विश्वात भारत महान होता, मग आपल्याकडे १२०० वर्षांची गुलामी आली होती, (त्यांच्या शब्दात स्वातंत्र्योत्तर मानसिक गुलामी सहित) मोदी येऊन पुन्हा आपल्याला महानतेकडे घेऊन जाईपर्यंत. दुसऱ्या संरचनेत इतर जागतिक नेते त्याचे उपाय समोर ठेवत आहेत, पण आपल्याकडे कोरोना विषाणू हे संकट नाही तर आतापर्यंतचे नुकसान भरून काढण्याचा मार्ग आहे, ही भारताला पुन्हा नव्याने महान बनविण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाला पूर्णत्वास नेण्याची एक संधी आहे. पण त्यांना बिनशर्त विश्वास हवा आहे. या चौकटीत लोकांना होणारा त्रास हा नोटबंदीप्रमाणेच मोदींवरच्या विश्वासाची परीक्षा आहे. देशातील लोकांचा देशावरचा आणि मोदींच्या नेतृत्वावरचा विश्वास बरेच लोक या विश्वासावर टिकून राहतात, निराश होण्याऐवजी ते या दुःखाला अर्थ देतात, हे अवास्तव नाही. मोदी त्यांना क्षुल्लक गोष्टी, अत्यंत दुखी अस्तित्व ओलांडून पलीकडे जाण्याचे आणि स्वतःपेक्षा मोठ्या अशा कार्याचा भाग होण्याचे आवाहन करतात. दुःख विश्वासाला मजबूत करते कमकुवत नाही. कारण याच वेळी आपल्याला त्याची जास्त गरज असते. हा विश्वास नुकताच थाळी, दिवे सारख्या चष्म्यांनी पवित्र विधींमध्ये केला होता. ज्यामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. मोदींनी लोकांना सात शपथांचे ही पालन करण्यास सांगितले, ज्यामध्ये वृद्धांची काळजी घेणे, गरीब लोकांची काळजी घेणे आणि तुमच्या कामगारांसोबत दयाळूपणे वागणे यांचा समावेश होता. त्यासोबतच त्यांनी त्यांचा योगा करतानाचा ऍनिमेटेड व्हिडिओ ही प्रसारित केला जो लाखो लोकांनी पहिला. याद्वारे ते भारताच्या बाबतीत त्यांच्या मनात असणाऱ्या सामाजिक, नैतिक आणि अध्यात्मिक नेतृत्वाच्या दाव्यांना आणखी दृढ करत होते. 

मदत उपाय हे परोपकार आहेत 
अशाचप्रकारे मोदी त्यांची भाषणे साक्षात्काराच्या वलयाभोवती गुंडाळतात. इतर लोकशाही नेते जे संकटकाळात लोकांच्या समस्या समजून घ्यायला रोज बोलतात त्यांच्यासारखे मोदी रोज बोलत नाहीत. ते काही आठवड्यातून एकदाच संवाद साधतात. ते लोकांना नव्या साक्षात्काराची वाट बघू देतात, म्हणूनच ते एक-दोन दिवस आधी ते घोषणा करतात. ही पोकळी वन्य अनुमानांनी भरली जाते, एखाद्या कल्पित देवाची प्रार्थना केल्यासारखे लोक त्यांच्या इच्छा आणि आशा व्यक्त करतात. मग ठरलेल्या वेळात ते प्रकट होतात. त्यांची भाषणे प्रवचनाचा भाग, ईश्वरी आज्ञेचा भाग आहेत. अनेकदा भाषणांच्या मध्ये एखादी घोषणा असते जी धक्कादायक अथवा चकाकीत असते. उत्तेजित आर्थिक पॅकेज जे इतर जागतिक नेत्यांनी संकटकाळात उपाय म्हणून जाहीर केले ते मोदींनी असे प्रकट केले जणू सत्य साई बाबांनी सोन्याचे अंडे दिले आहे. “२० लाख कोटी रुपये” असे ते वारंवार सांगत राहिले आणि पॅकेजच्या प्रमाणात आपल्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करू पाहत राहिले. त्यांनी त्याला मोदी पॅकेज म्हंटले नव्हते, (हे नामांकन मृगजळाप्रमाणे माध्यमांसाठी सोडले गेले होते) पण त्यांनी ते असे सादर केले जणू काही वैयक्तिक परोपकार करत आहेत. आणि लोकांच्या कल्पनाही करू शकणार नाहीत असे काहीतरी मोठे देत आहेत. “मोदी पॅकेज हे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेइतके/ त्यापेक्षा मोठे आहे” अशी ओरड त्यांच्या मुख्य प्रवाहातील माध्यमांनी आणि सोशल मीडियावरील प्रसारकांनी सुरु केली. असे निष्पन्न झाले की वास्तविक वित्तीय पॅकेज हे इतर देशांच्या मानदंडाद्वारे किंवा भारतीय गरजेनुसारही मुख्यतः सरकारी थकबाकी आणि सुरक्षित कर्जे यांच्यासहित काही लाख कोटींचेच आहे.गुजरातमधील त्यांच्या काळात परिपूर्णरित्या केलेली ही त्यांची जुनी युक्ती आहे. जेव्हा त्यांनी व्हायब्रंट गुजरात समिटखाली लाखो कोटींच्या गुंतवणुकीची आकडेवारी सांगितली होती, पण प्रत्यक्षात मात्र कित्येक सामान्य सामंजस्य करार करण्यात आले होते. पण मोदी एखाद्या धार्मिक व्यक्तीप्रमाणे केवळ भव्य आणि प्रतिकात्मक गोष्टींवरच बोलतात. 

मंत्री जबाबदार असतील मोदी नाही –
त्यांच्या “आत्मनिर्भर भारत” या दृष्टीकोनाची जाणीव करून देणासाठी धोरणांच्या आखणीचे काम अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मोदी कोणतीच धोरणे जाहीर करत नाहीत किंवा विशिष्ट तपशिलांमध्ये जात नाहीत कारण ते त्या धोरणांसाठी लोकांकडून न्यायनिवाडा करून घेऊ इच्छित नाहीत. पण त्यांच्या दूरदृष्टीसाठी ते तत्पर असतात. जेव्हा धोरणे अपेक्षेपेक्षा कमी होतात तेव्हा त्या उणिवा आणि अपयशांमध्ये त्यांचे मंत्री कमी पडतात. जेव्हा स्थलांतरित कामगारांकडून रेल्वेच्या प्रवासासाठी तिकीट शुल्क आकारले जाते तेव्हा ती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची चूक असते. अगदी उजव्या विचारसरणीचे लोक निर्मला सीतारमण यांना दोषी ठरवितात जसे त्यांच्या पूर्वी असणाऱ्या अरुण जेटलींना दोषी धरत होते आणि केवळ ते अपयशी झाले म्हणून नाही तर मोदींना अपयशी केले म्हणून दोष देतात. मोदींचे मंत्री मानव आहेत आणि चुका करतात म्हणून ते जबाबदार आहेत याउलट मोदी कधीही चुका ना करणारे आणि कशासही जबाबदार नसणारे असे दैवी व्यक्तित्व आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्यासारखी मोदी यांनी स्वतःची एक टोकाची भूमिका घेतली आहे. जे आणखी एक दिव्य मार्गदर्शक, कधीही न चुकणारे नेते आहेत, ज्यांनी  सर्व सरकारी उपायांवर अंतिम मत मांडले आहे, देशाची राजकीय दिशा निश्चित केली आहे, देशाची नैतिक मूल्ये संस्कारित आणि प्रतिबिंबित केली आहेत, पण सरकारच्या अपयशासाठी राजकीय उत्तरदायित्व अधिक वरचढ आहे. जे त्यांच्या अधीन असलेल्या निवडून आलेल्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. 
मोदी कधीकधी गुप्त मतदानाच्या इथे लोकशाही कायदेशीरपणा मिळवतात, पण निवडणुकीच्या काळात हा संदिग्ध कायदेशीरपणा असतो. जो त्यांना पत्रकार परिषद, पारदर्शकता, लोकशाहीच्या मन वळविण्याचा, छाननी करण्याच्या सर्व प्रक्रियांच्या वरचढ बनवतो ज्याला ते मूकसंमती देत बेफिकिरीने दुर्लक्ष करतात. ते स्थलांतरित आणि गरीब लोकांच्या हाल-अपेष्टांकडे दुर्लक्ष करतात कारण ते कोणत्याच दोष, कमकुवतपणा आणि उपेक्षेला स्वतःला जबाबदार मानू शकत नाहीत. त्यांच्या अर्ध धार्मिक आवाहनाचा मुख्य गाभा म्हणजे ते कधीच चूक असू शकत नाहीत. जरी तुम्हाला त्यांच्या योजना समजल्या नाहीत तरी तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. खरंतर त्या योजना न समजलेल्याच खूप चांगल्या आहेत कारण त्या एखाद्या धार्मिक नेत्यामध्ये दर्शविली जाणारी दुर्गम संदिग्धता आणि गूढता अधिक सखोल करतात. म्हणूनच वास्तविक खूप कमी प्रमाणात संवाद करतात त्याऐवजी प्रवचनातून उपदेश देत असतात. अगदी एखाद्या सरकारी योजनेचे स्पेलिंग लावतानाही मोदी मंत्र जप किंवा त्याच्याशी संबंधित अक्षरे लावतात. त्यांनी देऊ केलेल्या गोष्टी अनिश्चितच नाहीत तर त्या मिळण्याची कोणतीच वेळ नाही आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवायचा.

“हिंदू” धर्म गाभा आहे – मोदींचे हे अर्ध-धार्मिक आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) त्यांच्या दशकांच्या प्रचाराद्वारे सक्षम केले आहे. या प्रचाराने हिंदूंच्या धर्माचा वापर “राष्ट्रीय उपासना” स्थापित भाजपा-आरएसएस ला बहिष्कृत करू पाहणाऱ्या, मतभेद निर्माण करणाऱ्या, निंदा स्थापित करणाऱ्या विरोधकांच्या विरोधाना निंदनीय तसेच नैतिक-राष्ट्रीय समाजातील विरोधकांना राष्ट्र-विरोधी म्हणून घोषित करण्यासाठी केला आहे. मोदींनी स्वतःला भारताच्या या धार्मिक संकल्पनेच्या दंतकथेत मोठ्या प्रमाणात लोकांच्या सहमतीने राष्ट्रीय मसीहा म्हणून घातले आहे. याचा परिणाम म्हणजे ही अशी लोकशाही ज्यामध्ये एका नेत्याकडे सर्व शक्ती असूनही देशाला एका विनाशकारी संकटाचा सामना करावा लागतो आहे. आणि जो वास्तविकतेला उत्तर देण्यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही आहे. वास्तविक जगात जीएसटी आणि नोटबंदीच्या चक्रव्यूहात अडकलेली आपली अर्थव्यवस्था एका विनाशकारी झटक्यातून जात आहे ज्याचे परिणाम दशकांपर्यंत टिकून राहू शकतील. उपासमारीमुळे होणाऱ्या मृत्यूंची याआधीच नोंद झाली आहे आणि कदाचित इथून पुढे ती केली जाणार नाही. परंतु त्या नवीन राष्ट्रीय श्रद्धेतील काहीसे अफू आपल्याकडे आहेत आणि आपण सातत्याने त्या “आत्म-निर्भर” भारताच्या दिशेने चाललो आहोत. जर खरोखरच मोदी खोटारडे संदेष्टा (भविष्यकथन करणारा) आहेत तर त्यांनी नरकाकडे जाणारा मार्ग प्रकाशित केला आहे तोही अत्यंत तेजस्वी प्रकाशात. 

लेखक पॉलिसी रिसर्च सेंटर, दिल्ली येथे संशोधन सहकारी आहेत. ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. प्रतिक्रियांसाठी संपर्क – 9561190500

 

You might also like