हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO : कोणत्याही प्रकारच्या बचत योजनेमध्ये नॉमिनेशन करणे खूप महत्वाचे ठरते. असे केल्याने खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याचे पैसे खातेदार ज्याला देऊ इच्छितो त्या व्यक्तीकडे जातात. तसेच सरकारनेही आता PF साठी ई-नॉमिनेशन करणे बंधनकारक केले आहे. PF खातेधारकांना आतापर्यंत ई-नॉमिनेशनशिवाय EPFO च्या वेबसाइटवर PF बॅलन्स आणि पासबुक सहजपणे पाहता येत होते, मात्र आता त्यांना तसे करता येणार नाही.
PF खातेदार आणि त्याच्या कुटुंबाला PF चे फायदे मिळवण्यासाठी ई-नॉमिनेशन करणे खूपच उपयुक्त आहे. याद्वारे जर एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर EPF, पेन्शन, इन्शुरन्सचे फायदे ऑनलाइन क्लेम आणि सेटलमेंट ई-नॉमिनेशन केल्यावरच करणे शक्य होते. इथे हे लक्षात घ्या कि, ई-नॉमिनेशनसाठी खातेधारकाकडे ऍक्टिव्ह UAN आणि मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. EPFO
नॉमिनी कोणाला बनवता येऊ शकते ???
PF खातेधारकांना फक्त आपल्या कुटुंबातील सदस्यांनाच नॉमिनी करता येईल. जर कुटुंब नसेल तर इतर व्यक्तीना देखील नॉमिनेट करता येते, मात्र कुटुंबाचा शोध लागल्यावर, कुटुंब नसलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नॉमिनेशन रद्द केले जाते. जर कर्मचाऱ्याने नॉमिनी व्यक्तीचा उल्लेख केला नसेल तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदाराला PF मिळवण्यासाठी उत्तराधिकार सर्टिफिकेट मिळविण्यासाठी सिव्हिल कोर्टात जावे लागते. EPFO
एकापेक्षा जास्त नॉमिनी करता येईल…
PF खातेधारकांना एकापेक्षा जास्त नॉमिनी देखील बनवता येतील. मात्र नॉमिनेशनची रक्कम कोणाला द्यायची याचा तपशील द्यावा लागेल. EPFO
अशा प्रकारे करा ई-नॉमिनेशन…
सर्वांत आधी EPFO च्या अधिकृत वेबसाइट http://epfindia.gov.in वर लॉग इन करा.
‘service’ टॅबमध्ये, ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘For Employess’ या टॅबवर क्लिक करा.
आता तुमच्या UAN ने लॉग इन करा.
मॅनेज टॅब दिसेल. यामध्ये ई-नॉमिनेशन सिलेक्ट करा.
आता तुमचा कायमचा आणि सध्याचा पत्ता टाका.
फॅमिली डिक्लेरेशन बदलण्यासाठी ‘Yes’ सिलेक्ट करा.
नॉमिनी डिटेल्स एंटर करा आणि ‘Save’ वर क्लिक करा.
आता ई-साईन चिन्हावर क्लिक करून पुढे जा.
तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मिळालेला OTP देखील भरा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता आपले नॉमिनेशन अपडेट केले जाईल. EPFO
हे पण वाचा :
Aadhar Card संबंधित सर्व सेवा आता घरपोच मिळणार !!!
UPI द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतील हे जाणून घ्या
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना 1 महिन्यात दिला अडीच पट नफा !!!
Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा