अशाप्रकारे टाळता येईल गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग; वाचा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग घेण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. भारतामध्ये देखील अनेक स्त्रियांमध्ये हा कर्करोग उभारी घेताना दिसत आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी एक लस देखील उपलब्ध आहे. HPV नावाची ही लस आहे. मुलींना तरुण वयात किंवा लग्न होण्यापूर्वी देणे गरजेचे असते. परंतु अविवाहित मुलींना ही लस देण्याबद्दल त्यांच्या आई-वडिलांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झालेला असतो. त्यामुळे ही लस्सी घेऊ देत नाही. परंतु ही लस देणे खूप गरजेचे आहे. गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग हा ह्यूमन डीपीलोमा या विषाणूच्या संसर्गामुळे होत असतो. या विषाणूचे संक्रमण शारीरिक संबंध आल्यानंतर होत असते. त्यामुळे गर्भाशयाच्या मुखात कर्करोग होण्याची शक्यता असते.

या विषाणूची लागण झाल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तसेच हा विषाणू अनेक दिवस आपल्या शरीरात राहतो. या HPV लसीकरणाचे वय हे मुलीच्या दहा वर्षापासून ते 45 वर्षापर्यंत असते. तसेच 12 ते 16 वर्षाच्या कालावधीत ही लस दिली, तर त्याचा चांगला फायदा होतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये किंवा प्रतिबंधित व्हावा. यासाठी HPV लस मुलींना किशोरवयात देणे किंवा लग्नानंतर शारीरिक संबंध पूर्वी देणे गरजेचे आहे. ही लस तुम्हाला इंजेक्शनच्या रूपात दिली जाते.

या लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस एक महिन्यानंतर दिला जातो. तर सहा महिन्यानंतर तिसरा डोस दिला जातो. जर तुमच्या मुलीचे वय 15 वर्षापेक्षा कमी असेल, तर दोन डोस देखील पुरे होतात. ज्या मुलींचे वय 26 वर्षापेक्षा कमी आहे. त्यांनी हे लसीकरण करणे गरजेचे आहे. गर्भवती महिलेने ही लस घेऊ नये, तसेच तुम्ही गर्भधारणेचे नियोजन करत असाल तरी ही लस घेऊ नये. तसेच एखादी स्त्री जर आजारी असेल तरी देखील ही लस घेऊ नये. परंतु जर ही लस घेण्याआधी तुमच्या शरीरामध्ये त्या विषाणूचे संक्रमण झाले असेल, तर त्यावर उपचार म्हणून या लसीचा उपयोग होत नाही. ही लस घेतल्यानंतर महिलांच्या अंगाला खाज येते. चक्कर येते अशी अनेक लक्षणे दिसतात. त्यामुळे ही लस घेतल्यानंतर 15 मिनिटे त्या मुलीने किंवा स्त्रीने दवाखान्याबाहेर जाऊ नये.

रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अनेक महिलांचा यामुळे मृत्यू देखील झालेला आहे. तरी देखील या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे गंभीर गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही. यावर उपलब्ध असून देखील प्रतिबंधात्मक लस घेण्यात अनेक महिला नकार देतात. परंतु भविष्यात जाऊन त्यांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते.